SCO Meet 2022: भारत-पाक चर्चा पुन्हा सुरू होणार? नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ पुढच्या महिन्यात भेटू शकतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:54 PM2022-08-11T15:54:06+5:302022-08-11T15:54:48+5:30
SCO Meet 2022: पुढच्या महिन्यात उझबेकिस्तानमध्ये SCO बैठक होणार आहे, यात व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंगदेखील येणार आहेत.
PM Modi to Meet Shehbaz Sharif: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पुढील महिन्यात भेट होऊ शकते. पुढच्या महिन्यात 15-16 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये शांघाई कॉरपोरेशन ऑर्गेनायझेशन(SCO) शिखर परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत शरीफ आणि मोदींची भेट होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सहभागी होणार असून दोघे भेटू शकतात, असे मानले जात आहे. पण, या बैठकीत नेमके कोणते मुद्दे असणार, दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होणार का? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये एकही औपचारिक बैठक झालेली नाही.
शी जिनपिंग आणि पुतिन यांचीही भेट होऊ शकते
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे समरकंदमधील याच बैठकीत सहभागी होणार आहेत. दोघे आले तर या दोन नेत्यांचीही भेट होऊ शकते. रशिया-युक्रेन युद्धानंतर पुतिन यांची आणि गलवान व्हॅलीच्या घटनेनंतर शी जिनपिंग यांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतलेली नाही.