VIDEO: ना हात मिळवला, ना चर्चा केली...; एस जयशंकर यांनी असे केले बिलावल भुट्टोचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:41 PM2023-05-05T13:41:34+5:302023-05-05T13:43:22+5:30

SCO Meet: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोची SCO परिषदेत भेट.

SCO Summit India; Neither shake hand nor discussed...; S Jaishankar welcomed Bilawal Bhutto like this | VIDEO: ना हात मिळवला, ना चर्चा केली...; एस जयशंकर यांनी असे केले बिलावल भुट्टोचे स्वागत

VIDEO: ना हात मिळवला, ना चर्चा केली...; एस जयशंकर यांनी असे केले बिलावल भुट्टोचे स्वागत

googlenewsNext


पणजी (गोवा) : पणजी येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचे स्वागत केले. यानंतर जयशंकर यांनी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यास सांगितले. बिलावल भुट्टो हे जवळपास 12 वर्षांनतर भारतात येत आहेत. मात्र, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील द्विपक्षीय चर्चेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. 

सीमावादामुळे बैठक महत्वाची
ANI च्या वृत्तानुसार, भुट्टो SCO कौन्सिल ऑफ फॉरेन मिनिस्टर्स (CFM) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, भुट्टो समोर येताच जयशंकर यांनी फक्त हात जोडले, बाकी काहीच चर्चा केली नाही. 

जयशंकर बोलत होते, पाकिस्तान ऐकत होता
दहशतवादाचा सर्वात मोठा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो समोर बसले होते. एस जयशंकर यांनी प्रथम सर्व परराष्ट्र मंत्र्यांना अभिवादन केले आणि नंतर दहशतवादावर बरेच भाष्य केले. एस जयशंकर म्हणाले की, दहशतवादाचा मुकाबला करणे ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे. भारत सीमेवरील दहशतवाद खपवून घेणार नाही. यावेळी त्यांनी सर्व देशांना एकत्र येऊन दहशतवादाचा सामना करण्याचे आवाहन केले. दहशतवाद्यांच्या निधीबाबतही त्यांनी देशांना सतर्क केले. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना मिळणारा निधी त्वरित थांबवावा लागेल.

बैठकीत चीन-पाकिस्तान सहभागी
तीन वर्षांपूर्वी 2020 च्या गल्वान व्हॅली हिंसाचारानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र, एक दिवस आधी चीनचे परराष्ट्र मंत्री चिन कांग यांनी भारत आणि चीन या दोघांनी नवे मार्ग शोधले पाहिजेत, असे म्हटले आहे. तत्पूर्वी, गोव्यातील बेनौलिम येथे मेगा बैठकीच्या वेळी जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्याशी चर्चा केली. 

Web Title: SCO Summit India; Neither shake hand nor discussed...; S Jaishankar welcomed Bilawal Bhutto like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.