तरुणीला घराबाहेर पडणंही होतंय लाजिरवाणं; स्कूटीच्या नंबर प्लेटवरील 'ती' तीन अक्षरं ठरतायत कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 09:34 AM2021-11-30T09:34:08+5:302021-11-30T09:34:27+5:30
स्कूटीच्या नंबर प्लेटवरून दिल्लीतील एका तरुणीला होतोय मनस्ताप. RTO कडे नंबर बंदलण्याची मागणी. तिला जी स्कूटी मिळाली त्यामध्ये S.E.X हे अल्फाबेट्स होते.
जरा विचार करा, जर तुमच्यासाठी तुमच्या गाडीचा नंबर हा लाजिरवाणी बाब ठरत असेल तर? अगदी अशीच घटना दिल्लीतील एका तरुणीसोबत घडली आहे. दिल्लीतील एका कॉलेज तरुणीला तिच्या वडिलांनी वाढदिवसाच्या दिवशी एक स्कूटर गिफ्ट केली. पण त्या स्कूटरचा जो नंबर आला तो आता त्या मुलीसाठी डोकेदुखी ठरत आहे.
दिल्लीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका तुरूणीला तिच्या वडिलांनी तिच्या मागणीनुसार एक स्कुटर गिफ्ट केली. तिच्या वडिलांनी साठवलेल्या पैशातून एक स्कूटर बुकही केली. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. परंतु तिची डोकेदुखील स्कूटर मिळाल्यानंतर तिच्या नंबर प्लेटवरून सुरू झाली. संबंधित तरुणीच्या स्कूटरला आरटीओकडून जो नंबर देण्यात आला त्यात नंबरच्या सीरिज ही S.E.X या अक्षरांपासून सुरू होणारी होती.
संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना जराही कल्पना नव्हती की केवळ एक नंबर प्लेट त्यांची डोकेदुखी वाढवू शकते. गाडीच्या नंबरमध्ये असणारे S.E.X ही अक्षरं अनेकांना विचित्र वाटू लागली. याशिवाय अनेकांनी रस्त्यातही संबंधित तरुणीच्या भावालाही सतावण्यास सुरूवात केली. तरुणीच्या भावानं घरी येऊन हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर तरुणीच्या मनात भीती निर्माण झाली. तसंच तिनं आपल्या गाडीचा नंबर बदलण्याची मागणीही केली.
दिल्ली आरटीओच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० हजार गाड्यांसाठी या सीरिजचे नंबर अलॉट करण्यात आले आहेत. परंतु लोकांच्या टोमण्यांपासून वाचण्यासाठी संबंधित तरुणीनं घराबेहर पडणंही बंद केलं. दरम्यान, तिनं ही नंबर प्लेट बदलण्याची मागणी केली असून हे खरंच शक्य आहे का हा प्रश्न निर्माण होतो. एकदा गाडीला नंबर अलॉट झाल्यानंतर तो बदलण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. ही प्रक्रिया एका सेट पॅटर्ननुसार चालते, अशी प्रतिक्रिया कमिश्नर ऑफ दिल्ली ट्रान्सपोर्ट के.के.दहिया यांनी दिली.