पुढच्या २४ तासांत क्यारची तीव्रता वाढणार, कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 08:35 PM2019-10-26T20:35:45+5:302019-10-26T20:36:05+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रिवादळामुळे सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे
बंगळुरू -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रिवादळामुळे सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये या चक्रिवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. क्यार चक्रिवादळाचा प्रभाव कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर दिसून येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तटरक्षक दलाने अलर्ट जारी करत बचाव कार्याच्या तयारीला वेग दिला आहे. तसेच समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना वाचवण्याचे काम सुरू आहे.
क्यार चक्रिवादळाबाबत माहिती देताना हवामान खात्याने सांगितले की, ''पुढच्या २४ तासांत अरबी समुद्रात क्यारचा प्रभाव वाढेल. याचा परिणाम किनारी भागांमध्ये दिसून येईल. त्यामुळे कर्नाटच्या काही भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. तसेच हे वाळक चक्रिवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे, मात्र नंतर हे चक्रिवादळ ओमानच्या किनाऱ्याच्या दिशेने जाईल.''
India Meteorological Department: The sea condition is very likely to be high to very high over east-central Arabian Sea during next 24 hours and phenomenal there after. It will be rough to very rough along & off north Karnataka coast during next 24 hours https://t.co/YwbL7ygi0K
— ANI (@ANI) October 26, 2019
क्यार चक्रिवादळामुळे वारे वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तसेच या काळात वाऱ्याचा वेग ताशी ८५ किमीपर्यंत जाऊ शकतो. महाराष्ट्रातील कोकण विभागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणच्या मच्छिमारांना माघारी बोलावण्यात आले आहे.