पांगरी येथील रेशन दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:05 PM2019-11-04T15:05:18+5:302019-11-04T15:05:27+5:30
सिन्नर : गेल्या काही महिन्यांपासून नियमित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाकडून तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त रेशन दुकान सील केले आहे.
सिन्नर : गेल्या काही महिन्यांपासून नियमित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाकडून तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त रेशन दुकान सील केले आहे. पांगरी खुर्द व पांगरी बुद्रुक येथील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत व पुरवठा विभागाकडे अनेक वेळा तक्रार केली होती. दुकान नियमितपणे न उघडणे, नियमित धान्याचे वितरण न होणे, याबाबत ग्रामस्थांनी रेशन दुकानदाराविरोधात तक्रारी केल्या होत्या. तालुका पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ यांनी दोन महिन्यांपूर्वी सदर दुकानदारास समज दिली होती. आॅक्टोबर महिन्याचा धान्यमाल वाटप करण्यात आला नाही, यामुळे शुक्र वारी (दि.१) सकाळी ११ वाजता पुरवठा निरीक्षक धुमाळ यांनी प्रत्यक्ष भेट देवून पंचनामा केला. सरपंच मीना शिंदे, मच्छिंद्र शिंदे, वसंत सालके, सचिन दळवी, बाबासाहेब शिंदे यांच्या सही व साक्षीने दुकान सील करण्यात आले.
------------------------------
सदर दुकानदाराबाबत अनेक तक्र ारी आल्या होत्या. घरोघरी जाऊन अंगठ्याचे ठसे घेत होता. धान्याचे कमी वाटप केले जात होते. त्यात अनियमतिता असल्याने दुकान सील करण्यात आले आहे. लाभार्थ्यांसाठी येत्या दोन दिवसात पांगरी येथील भानुदास पांगारकर यांच्या स्वस्त धान्य दुकानला तात्पुरते रेशन वाटप वर्ग करण्यात येईल.
-विशाल धुमाळ, तालुका पुरवठा निरीक्षक