निलंबित आमदाराच्या घराला सील

By admin | Published: May 12, 2016 03:59 AM2016-05-12T03:59:02+5:302016-05-12T03:59:02+5:30

बिहार राज्य विधान परिषदेच्या सदस्य मनोरमादेवी यादव यांना संयुक्त जनता दलातून निलंबित करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराला सील ठोकले

Sealed the house of suspended MLA | निलंबित आमदाराच्या घराला सील

निलंबित आमदाराच्या घराला सील

Next

गया : बिहार राज्य विधान परिषदेच्या सदस्य मनोरमादेवी यादव यांना संयुक्त जनता दलातून निलंबित करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराला सील ठोकले. आ. मनोरमादेवी यादव यांच्या घरात दारूच्या बाटल्या सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्या सध्या फरार असून, त्यांना
अटक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने यादव यांच्या अनुग्रह पुरी कॉलनीतील घराला सील ठोकले. सोमवारी त्यांच्या घराची झडती घेताता घरात दारूच्या १८ बाटल्या सापडल्या होत्या. बिहारमध्ये दारुबंदी लागू करण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय.
दारू सापडल्यानंतर यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आ. यादव यांचा पुत्र रॉकी यादव याला शोधण्यासाठी पोलिसांनी यादव यांच्या घराची झडती घेतली होती. ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून रॉकीने शनिवारी रात्री एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. रॉकीला गया पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Sealed the house of suspended MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.