भाजपाच्या नव्या अध्यक्षाचा शोध सुरू

By admin | Published: November 13, 2015 12:56 AM2015-11-13T00:56:59+5:302015-11-13T00:56:59+5:30

पुढच्या दोन कार्यकाळासाठी अमित शहा हेच भाजपा अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी अगदी ठामपणे सांगितले असले तरी येत्या जानेवारीमध्ये नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या

The search for the new president of BJP will start | भाजपाच्या नव्या अध्यक्षाचा शोध सुरू

भाजपाच्या नव्या अध्यक्षाचा शोध सुरू

Next

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पुढच्या दोन कार्यकाळासाठी अमित शहा हेच भाजपा अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी अगदी ठामपणे सांगितले असले तरी येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या दिशेने शोध प्रारंभ झाला आहे.
अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने गेल्या जानेवारीत पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मानहानीजनक पराभवापासून कोणताही धडा घेतला नसल्याकारणाने आता ‘मोठी सुधारणा’ करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्याचे संघातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतून प्रस्थान करण्याआधी, बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेले अपयश आणि विरोधकांना भाजपाविरुद्ध एकजूट करण्याची संधी निर्माण करून दिल्याबद्दल अमित शहा यांना चांगलेच फटकारल्याची माहिती आहे. राजनाथसिंग यांनी बुधवारी भागवतांची प्रदीर्घ भेट घेतल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता नाकारली असली तरी, आपण पुन्हा पक्ष संघटनेत परत येऊ इच्छितो, असे राजनाथसिंग यांनी सरसंघचालकांना अगदी प्रांजळपणे सांगितल्याची माहिती त्यांच्या विश्वासातील सूत्रांकडून मिळाली आहे.
अमित शहा यांची डिसेंबर-जानेवारीत पूर्ण तीन वर्षांसाठी पक्षाध्यक्ष म्हणून फेरनिवड केली जाईल, असे राजनाथसिंग यांनी निक्षून सांगितले असले तरी शहा यांनी पक्षाध्यक्ष राहावे, असे संघ परिवारात कुणालाही वाटत नाही. भाजपाने लोकसभेच्या २८२ जागा जिंकल्या त्यावेळी राजनाथसिंग हे पक्षाध्यक्ष होते आणि पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याची त्यांची इच्छा होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना गृहमंत्री म्हणून केंद्रात आणले आणि उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा जिंकून दिल्याबद्दल बक्षीस म्हणून शहा यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपविले.
रा.स्व.संघालाही मोदींच्या या निर्णयापुढे झुकावे लागले. त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपाला प्रचंड यश मिळाले. परंतु या तिन्ही राज्यांत विरोधी पक्ष विभाजित असल्यानेच भाजपाला यश मिळाले, हे नाकारता येणार नाही.
भाजपा अध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आघाडीवर असल्याचे या सूत्रांनी सांगितले. गडकरी हे २०१२ मध्ये पक्षाध्यक्ष होते. परंतु त्यांच्या पूर्ती कारखान्यावर आयकर खात्याचा छापा पडल्यानंतर त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून राजनाथसिंग यांना नियुक्त करण्यात आले होते. कालांतराने तो छापा नव्हताच, हे स्पष्ट झाले असले तरी जे नुकसान व्हायचे होते ते झालेच.

Web Title: The search for the new president of BJP will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.