ड्राेन हल्ल्याचा दुसरा प्रयत्न उधळला, सैन्यातील जवानांनी पिटाळून लावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:55 AM2021-06-29T06:55:31+5:302021-06-29T06:56:03+5:30
जम्मूमध्ये जवानांनी दाेन ड्राेन्स पिटाळून लावले
जम्मू : जम्मू विमानतळावर रविवारी झालेल्या ड्राेन हल्ल्यानंतर काही तासांमध्ये जवळच्या लष्करी तळाजवळही ड्राेनच्या हालचाली टिपण्यात आल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली. जम्मूच्या जवळ असलेल्या रत्नूचाक आणि कालूचाक या लष्करी तळांजवळ ड्राेन्सच्या संशयास्पद हालचाली टिपताच जवानांनी गाेळीबार करून ड्राेन्स पिटाळून लावल्याची माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी ले. कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली. दोन्ही ड्राेन्सचे नियंत्रण भारतीय हद्दीतून हाेत असल्याचाही संशय आहे.
ड्राेनचा वापर करून घडविण्यात आलेला अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला हाेता. दहशतवाद्यांकडून ड्राेन्सचा वापर नवा नाही. जम्मू आणि पंजाबच्या सीमेवर शस्त्रे, स्फाेटके व ड्रग्सतस्करी २-३ वर्षांपासून सुरू आहे. महिनाभरापूर्वीही सांबा सेक्टरवर असा प्रयत्न झाला हाेता. जवानांनी सीमेजवळ टाकलेली शस्त्रे जप्त केली हाेती. गेल्या वर्षी जूनमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एक ड्राेन पाडला हाेता.