महिला वार्षिक उत्सवाचा दुसरा दिवस उत्साहात
By Admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच
म िलांच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच अनुया दळवी यांचे प्रतिपादन : महिला मंडळाचा वार्षिक उत्सवाचा दुसरा दिवसऔरंगाबाद : आजच्या महिला घर आणि करिअर अशा दोन्ही जबाबदार्या पार पडतात. याच महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. महिलांच्या संरक्षणासंदर्भात विचार केला असता, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सर्वांचीच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. अनुया दळवी यांनी केले. स्फूर्ती महिला मंडळातर्फे आयोजित महिला मंडळाच्या वार्षिक उत्सवाच्या दुसर्या दिवशीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा अलका सुभेदार, कालिंदी कोरडे, मीना देशपांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला मंडळाच्या मावळत्या कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करून वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अनुया दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. महिला मंडळाच्या दोन वर्षांच्या कार्याच्या अहवाल वाचन झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, महिला मंडळ हे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया पार पाडत आहे. महिला मंडळांमुळेच एकत्रित येण्यास मदत होते. यानिमित्ताने संवादाच्या प्रक्रियेत वाढ होते. ------फोटो आहे----