दुसर्याच दिवशी टाकल्या रोपांनी माना दोन कोटी वृक्ष लागवड : कुंभारखोरीमध्ये झाडांना पाणी नाही, प्लास्टिक अस्ताव्यस्त
By admin | Published: July 3, 2016 12:32 AM2016-07-03T00:32:40+5:302016-07-03T00:32:40+5:30
जळगाव : दोन कोटी वृक्ष लागवड अभियानात शुक्रवारी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित लाखो रोपटे लावली. मात्र त्यांची काय स्थिती आहे अथवा त्यांची देखभाल व्हावी यासाठी कोणीही फिरकत नसल्याने वृक्षारोपणाच्या दुसर्याच दिवशी रोपट्यांनी माना टाकल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Next
ज गाव : दोन कोटी वृक्ष लागवड अभियानात शुक्रवारी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित लाखो रोपटे लावली. मात्र त्यांची काय स्थिती आहे अथवा त्यांची देखभाल व्हावी यासाठी कोणीही फिरकत नसल्याने वृक्षारोपणाच्या दुसर्याच दिवशी रोपट्यांनी माना टाकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून शासकीय कर्मचार्यांसह सर्वांमध्ये वृक्षारोपणाचा उत्साह होता. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपवाटिकेतून तालुकानिहाय रोपांचे वाटप करण्यात आले होते. काही सेवाभावी संस्थांतर्फेही मोफत रोपांचे वाटप झाले. शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदविला होता. वनविभागातर्फे १३ हजार वनमजुरांच्या मदतीने या रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी १४ लाख ५४ हजार ८५५ खड्डे तयार करण्यात आले होते. या वेळी वृक्षारोपण करून अनेकांनी सेल्फीही काढून घेतले. दुसर्या दिवशी या रोपांची काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी लोकमतने ठिकठिकाणी भेट दिली असता दिसून आलेले हे चित्र असे....कुंभारखोरी...कुंभारखोरी उद्यानात शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला होता. या वेळी नेते, अधिकारी वर्ग येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याच ठिकाणी रोपांची गंभीर स्थिती असल्याचे दिसून आले. काल रोपं तर लावली गेली मात्र आज येथे पाण्याअभावी ती गळून पडल्याचे चित्र येथे आहे. जास्त उंचीची रोपं तर हवेने खाली वाकून गेली आहे. प्लास्टिक पिशव्या तेथेच पडून....रोप तर लावली मात्र त्यांच्या प्लास्टिक पिशव्या जागोजागी पडलेल्या आहेत. या सोबतच पाण्याचे पाऊचही येथे अस्ताव्यस्त पडलेले आहे. हेच प्लास्टिक इतरत्र पसरुन त्यामुळे नुकसान होऊ शकते. ते उचलण्याचीही कोणी तसदी घेतलेली नाही. येथील रोपांना पिंजरा (ट्री गार्ड) लावलेले नाही. त्यामुळे हवेने ते खाली पडण्यास मदत होत आहे. खड्डे खोदल्यानंतर रोपं लावली व त्यातील माती थोडीफार खड्यात टाकली, मात्र इतर मातीचे ढीग तसेच पडून आहे. मेहरुण चौपाटी....मेहरुण परिसरात लावलेल्या झाडांना पिंजरा (ट्री गार्ड) लावलेले आढळून आले. सोबतच येथे जैन इरिगेशनच्या बंबाद्वारे पाणी दिले जात होते. एकूणच रोपं सुस्थितीत आहे. लांडोरखोेरी....या ठिकाणी काही रोपं बाजूला पडलेली दिसून आली. मात्र ही रोपं येथे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथे नियोजनबद्ध काम सुरू असल्याचे आढळून आले.