दुसर्या सोडतीचा मूहूर्त १३ जुलैनंतर २५ टक्के प्रवेश : ५७ अर्ज प्रलंबित
By Admin | Published: July 12, 2016 12:09 AM2016-07-12T00:09:02+5:302016-07-12T00:09:02+5:30
जळगाव : शिक्षण हक्क्क कायद्यानुसार गोरगरीब व्यक्तींच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये १ ली, बालवाडीमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत ५७ अर्ज प्रलंबित असल्याने सोमवारी निघू शकली नाही.
ज गाव : शिक्षण हक्क्क कायद्यानुसार गोरगरीब व्यक्तींच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये १ ली, बालवाडीमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत ५७ अर्ज प्रलंबित असल्याने सोमवारी निघू शकली नाही. यामुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावर पाणी फिरले. शिक्षण विभागाने नोटिसा देऊनही काही संस्था जुमानत नसल्याने हा प्रकार घडत आहे. या प्रक्रियेतून २२०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यायचा आहे. परंतु अद्याप फक्त १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. इतर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत काढायची आहे. परंतु या प्रक्रियेतून आलेले मागील सोडतीचे प्रलंबित अर्ज निकाली निघणार नाही तोपर्यंत ही सोडत काढणे शक्य नाही. बैठकही बेदखलदुसरी सोडत मागील अर्ज प्रलंबित असल्याने आणि काही शाळा ऑनलाईन माहिती भरत नसल्याने काढता येत नाही. प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, असे आदेश ३० जून रोजी मु.जे.महाविद्यालयात झालेल्या २५ टक्के प्रवेश आढावा बैठकीत शिक्षण विभागाने दिले होते. तसेच या प्रक्रियेबाबत चालढकल करणार्या संस्था, शाळांना नोटिसा देण्यात आल्या. परंतु तरीदेखील ५७ अर्ज प्रलंबित असून, दुसरी सोडत काढण्यास विलंब होत आहे. प्रलंबित अर्जांची माहिती : जामनेर- ३१, जळगाव- ११, भडगाव- ८, चोपडा- ६, पाचोरा-१. संबंधित शाळांना नोटिसा बजावण्याचे आदेश पुन्हा देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली. दुसरी सोडत १३जुलैनंतरयेत्या दोन दिवसात २५ टक्के प्रवेशाबाबत सोडत काढण्यात येईल, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. दोन्ही शिक्षणाधिकारी नाशिकला जाणारई-गर्व्हन्सबाबत बालभारतीचे अध्यक्ष ११ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथे बैठक घेत आहे. त्यात उपस्थित राहण्यासाठी दोन्ही शिक्षणाधिकारी नाशिक येथे जाणार असल्याची माहिती मिळाली.