घरकूल मक्तेदाराला दुसरी नोटीस शेवटची संधी : काम सुरू करण्यास टाळाटाळ; कारवाईचा इशारा
By admin | Published: April 19, 2016 11:21 PM2016-04-19T23:21:47+5:302016-04-19T23:21:47+5:30
जळगाव : केंद्र शासनाच्या आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे सुरू असलेले घरकुलांचे काम मक्तेदाराने अर्धवट अवस्थेत बंद केले आहे. वाढीव दर मंजूर झालेले असताना व मनपाने आधीचे देणे दिलेले असतानाही मक्तेदाराकडून काम सुरू करण्यास टाळाटाळ होत असल्याने बांधकाम विभागाने मक्तेदाराला शेवटची संधी म्हणून दुसरी नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे.
Next
ज गाव : केंद्र शासनाच्या आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे सुरू असलेले घरकुलांचे काम मक्तेदाराने अर्धवट अवस्थेत बंद केले आहे. वाढीव दर मंजूर झालेले असताना व मनपाने आधीचे देणे दिलेले असतानाही मक्तेदाराकडून काम सुरू करण्यास टाळाटाळ होत असल्याने बांधकाम विभागाने मक्तेदाराला शेवटची संधी म्हणून दुसरी नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे.केंद्र शासनाच्या आयएचएसडीपी योजनेंतर्गत मनपातर्फे घरकूल योजना राबविण्यात येत आहे. यासाठी औरंगाबाद येथील मक्तेदारास मक्ता देण्यात आला आहे. मक्तेदाराने ४७२ घरकुलांची योजना असताना त्यापैकी २६० घरकुलांचे काम जवळपास पूर्ण केले आहे. मात्र उर्वरित घरकुलांसाठी तीन इमारतींचे काम अद्यापही सुरू केलेले नाही. शासनाने हे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ ची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे तत्पूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. उर्वरित २१२ घरकुलांसाठी ३ इमारतींचे काम बाकी आहे. मक्तेदाराने प्रतिघरकूल २ लाख रुपये वाढवून मागितल्याने सुधारित डीपीआर केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाल्यावर तसेच आधीची थकबाकी मिळाल्यावर काम सुरू करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार झालेल्या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. तसेच सुधारित डीपीआरही मंजूर झाला आहे. केवळ त्याचे लेखी आदेश येणे बाकी आहेत. मक्तेदाराने मनपाला मुदतीत काम पूर्ण करण्याची हमी दिली आहे. नोटीसला थातूरमातूर उत्तरमार्च २०१७ पूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही मक्तेदार वेगवेगळी कारणे पुढे करून काम सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याने मक्ता घेतलेल्या कंपनीच्या मालकाला आयुक्तांनी चर्चेसाठी पाचारण केले होते. तसेच मक्तेदाराला नोटीसही बजावण्यात आली. मात्र मक्तेदाराने या नोटीसलाही थातूरमातूर उत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ----------तर मक्तेदारावर कारवाईमनपा बांधकाम विभागाने वारंवार सूचना देऊन तसेच एक नोटीस देऊनही मक्तेदाराने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे मक्तेदारास शेवटची संधी म्हणून आणखी एक नोटीस देण्यात येणार असून तरीही काम सुरू न केल्यास मक्तेदारावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.