कुंभमेळ्याचे दुसरे शाही स्नान!
By admin | Published: May 10, 2016 03:18 AM2016-05-10T03:18:48+5:302016-05-10T03:18:48+5:30
एक महिना चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे दुसरे शाही स्नान सोमवारी सुरू झाले. या शाही स्नानाची सुरुवात करताना जुना आखाडाच्या नागा बाबांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला
उज्जैन : एक महिना चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे दुसरे शाही स्नान सोमवारी सुरू झाले. या शाही स्नानाची सुरुवात करताना जुना आखाडाच्या नागा बाबांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष केला. सूर्योदयाच्या आधीपासून दुपारी १२पर्यंत साधूंनी शाही स्नानासाठी रामघाटावर गर्दी केली होती.शाही स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली असून, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आलेल्या
या शाही स्नानाला अधिक शुभ समजले जात आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, या दुसऱ्या शाही स्नानासाठी २५ लाख भाविक उज्जैनमध्ये दाखल झाले आहेत. उज्जैनमध्ये सोमवारी एकीकडे शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळलेली असतानाच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने या कार्यक्रमात व्यत्यय आला. दुपारी ३नंतर वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस व वादळी वारे सुरू झाले.