हिमाचलसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी! फेरबदल केल्याने इच्छुकांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:04 PM2022-10-22T12:04:51+5:302022-10-22T12:05:23+5:30

रमेश धवला हे देहरामधून तर रविंदर सिंग रवी हे माजी मंत्री ज्वालामुखीतून निवडणूक लढविणार आहेत.

Second list of BJP candidates for Himachal! Excitement among aspirants due to reshuffle | हिमाचलसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी! फेरबदल केल्याने इच्छुकांमध्ये खळबळ

हिमाचलसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी! फेरबदल केल्याने इच्छुकांमध्ये खळबळ

Next

- मोनिका गुप्ता

चंदीगड : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने सर्व ६८ मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत कुल्लूमधून महेश्वर सिंग, बारसरमधून माया शर्मा, हरोलीतून प्रा. रामकुमार आणि रामपूरमधून कौल नेगी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

रमेश धवला हे देहरामधून तर रविंदर सिंग रवी हे माजी मंत्री ज्वालामुखीतून निवडणूक लढविणार आहेत. यावेळी धवला आणि रविंदर रवी यांच्या मतदारसंघात बदल करण्यात आला आहे. ज्वालामुखी हा रमेश धवला यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. रविंदर रवी यांच्यासाठीही देहरा मतदारसंघ सुरक्षित होता.

१९९८ मध्ये अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलेल्या धवला यांनी नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. ते माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांच्या जवळचे आहेत. गेल्या पाच वर्षांत धवला हे त्यांच्याच सरकारच्या कार्यशैलीविरुद्ध आक्रमक दिसले. संघटनेचे सरचिटणीस पवन राणा यांच्यासोबत त्यांचा संघर्ष दिसून आला. माजी मंत्री रविंदर सिंग रवी यांना तिकीट देऊन रमेश धवला यांना ज्वालामुखी येथे पाठवून भाजपाने नवीन प्रयोग केला आहे. मात्र, अपक्ष होशियार सिंग यांना तिकीट न दिल्याने ते भाजपासमोर आव्हान ठरणार आहेत.

रविंदर सिंग रवी
देहरा हा रविंदर सिंग रवी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. धुमल सरकारमध्ये ते मंत्री आहेत. २०१२ मध्ये थुरल मतदारसंघ रद्द केल्यानंतर रविंदर सिंग रवी यांनी देहरामधून निवडणूक लढविली. त्यानंतर २०१७ पर्यंत ते देहरामधून निवडणूक लढवित राहिले. गेल्या निवडणुकीत अपक्ष होशियार सिंग यांनी त्यांचा पराभव केला. भाजपाने नुकतेच होशियार सिंग यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर रविंदर सिंग रवी हे नाराज झाले. आता त्यांना ज्वालामुखीतून तिकीट देण्यात आले आहे. ज्वालामुखीमध्ये रमेश धवला यांच्या विरोधात असलेल्या भाजपाच्या प्रभावशाली गटाला शांत करणे हाही त्यामागचा उद्देश आहे.

कौल नेगी
प्रतिभा वीरभद्र सिंग यांचे रामपूर येथे घर आहे. हा राखीव मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपा निवडणूक हरत आलेला आहे. अभाविपच्या माध्यमातून भाजपामध्ये आलेले तरुण कौल नेगी यांना यंदा संधी देण्यात आली आहे.

बरसरमधून माया शर्मा
माजी आमदार बलदेव शर्मा यांच्या पत्नी माया शर्मा या बारसरमधून निवडणूक लढविणार आहेत. २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार इंद्रदत्त लखनपाल यांच्याकडून बलदेव शर्मा यांचा पराभव झाला होता. यावेळी माया शर्मा यांना तिकीट देऊन महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

हरोलीतून प्रो. रामकुमार
हरोलीतून काँग्रसचे मुकेश अग्निहोत्री यांच्याविरोधात भाजपाने प्रो. रामकुमार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रो. रामकुमार यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये अग्निहोत्री यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली आणि दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला.

कुल्लूमधून महेश्वर सिंह
२०१७ मध्ये महेश्वर सिंह हे काँग्रेसचे उमेदवार सुंदर सिंह ठाकूर यांच्याकडून निवडणूक हरले. महेश्वर सिंह हे २०१२ मध्ये त्यांचा नवीन पक्ष हिलोपामधून आमदार झाले. महेश्वर सिंह यांचा मुलगा हितेश्वर सिंह हेदेखील बंजारमधून उमेदवारी मागत होते.

Web Title: Second list of BJP candidates for Himachal! Excitement among aspirants due to reshuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.