सीबीआयच्या नवीन प्रमुखांबाबत दुसरी बैठकही अनिर्णीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 03:20 AM2019-02-02T03:20:28+5:302019-02-02T03:20:50+5:30
सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीचे रहस्य कायम
नवी दिल्ली : सीबीआयच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या दुसऱ्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीचे रहस्य कायम आहे.
याआधी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हंगामी सीबीआय संचालकांच्या नियुक्तीला विरोध नाही. तथापि, केंद्र सरकारने तातडीने नियमित सीबीआय संचालकांची नियुक्ती करायला हवी. हे पद महत्त्वाचे आणि संवेदनशील आहे. तेव्हा दीर्घावधीसाठी हंगामी संचालक ठेवणे योग्य नाही. सरकारने या पदावर अद्याप नियुक्ती का केली नाही? अशी विचारणाही न्या. अरुण मिश्रा आणि नवीन सिन्हा यांच्या न्यायपीठाने नागेश्वर राव यांच्या या पदावरील हंगामी नियुक्तीला आव्हान देणाºया याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केली. दरम्यान, आज सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी बोलाविण्यात आलेल्या निवड समितीच्या बैठकीतही कोणताही निर्णय होऊ शकला, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने बैठकीबाबत अधिक तपशील स्पष्ट न करता सांगितले.
खरगे यांचा आक्षेप...
नवीन संचालकपदासाठी प्रस्तावित अधिकाºयांबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आक्षेप आहे. असे असतांनाही केंद्र सरकार भावी संचालकांचे नाव घोषित करण्याची शक्यता दिसते. या पदासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी जाविद अहमद, रजनी कांत मिश्रा, एस. एस. देसवाल आणि शिवानंद झा हे शर्यतीत आहेत.