लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी; १२ राज्यांतील ८८ जागांवर मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:54 IST2024-03-28T16:54:10+5:302024-03-28T16:54:54+5:30
loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून ७ टप्प्यात देशात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी; १२ राज्यांतील ८८ जागांवर मतदान
नवी दिल्ली - Phase 2 Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा सुरू केली आहे. अद्यापही आघाडी आणि युतीमध्ये काही जागांवरून चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली आहे. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जारी केले आहे.
Elections alert 🚨
— Election Commission of India (@ECISVEEP) March 28, 2024
Filing of nominations in the second phase of General #Elections2024 began today (1/2)#ChunavKaParv#DeshKaGarv#ECI#YouAreTheOnepic.twitter.com/AUAZlcZafC
दुसऱ्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान?
आसाम - ०५
बिहार - ०५
छत्तीसगड - ०३
जम्मू काश्मीर - ०१
कर्नाटक - १४
केरळ - २०
मध्य प्रदेश - ०७
महाराष्ट्र - ०८
राजस्थान - १३
त्रिपुरा - ०१
उत्तर प्रदेश - ०८
पश्चिम बंगाल - ०३
मणिपूर - ०१
दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ४ एप्रिल २०२४ अखेरची तारीख आहे. तर ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील या जागांसाठी होणार मतदान?
अकोला
अमरावती
बुलढाणा
हिंगोली
नांदेड
परभणी
वर्धा
यवतमाळ-वाशिम