आसाम, पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्याचे मतदान सुरु

By admin | Published: April 11, 2016 08:07 AM2016-04-11T08:07:24+5:302016-04-11T08:07:24+5:30

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण विधानसभेच्या ९२ जागांसाठी मतदान होत आहे.

Second phase polling begins in Assam, West Bengal | आसाम, पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्याचे मतदान सुरु

आसाम, पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्याचे मतदान सुरु

Next

ऑनलाइन लोकमत 

गुवहाटी, दि. ११ - आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी मतदान सुरु झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण विधानसभेच्या ९२ जागांसाठी मतदान होत आहे. आसाममध्ये मतदानाचा दुसरा आणि अंतिम टप्पा असून, एकूण ६१ उमेदवार रिंगणात आहेत तर पश्चिम बंगालमध्ये ३१ जागांसाठी मतदान होत आहे. 
 
आसाममध्ये ५२५ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत तर, पश्चिम बंगालमध्ये ३१ जागांसाठी १६३ उमेदवार रिंगणात आहेत. आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस सत्तेवर आहे. या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय ताकद वाढवणे भाजपचे लक्ष्य असल्याने भाजपने इथे जोरदार प्रचार केला आहे. 
 
राष्ट्रीय राजकारणावर या निवडणूक निकालांचा प्रभाव पडणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकूण एक कोटी ७० लाख नागरीकांकडे मतदानाचा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाम आणि पश्चिम बंगालच्या जनतेला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 
 

Web Title: Second phase polling begins in Assam, West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.