दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2015 11:39 PM2015-10-14T23:39:21+5:302015-10-14T23:39:21+5:30

बिहारमध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त सहा जिल्ह्यांमधील ३२ विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी १६ आॅक्टोबरला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या

The second phase of the publicity spilled | दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला

Next

पाटणा : बिहारमध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त सहा जिल्ह्यांमधील ३२ विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी १६ आॅक्टोबरला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या. उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत.
बिहार विधानसभेच्या एकूण २४३ पैकी ३२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ४५८ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक २२ उमेदवार जहानाबादच्या कुर्था मतदारसंघात, तर सर्वात कमी ७ उमेदवार इमामगंज (सु) येथून रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. इमामगंज (सु)मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी आणि विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्यात मुकाबला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The second phase of the publicity spilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.