दुस-या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ७९.७० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 03:32 PM2016-04-17T15:32:53+5:302016-04-17T20:05:31+5:30
पश्चिम बंगालमध्ये दुस-या टप्प्यात एकूण ७९.७० टक्के इतके भरभरुन मतदान झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये रविवारी विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यामध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. दुस-या टप्प्यात एकूण ७९.७० टक्के इतके भरभरुन मतदान झाले. ५६ जागांसाठी एकूण ३८३ उमेदवार रिंगणात असून, यात ३३ महिला आहेत. एकूण १.२ कोटी नागरीकांकडे मतदानाचा अधिकार होता.
माओवाद्यांच्या धोक्यामुळे बीरभूम जिल्ह्यातील सात मतदारसंघात मतदानाची वेळ चारवाजेपर्यंत होती. अन्य मतदारसंघात सहावाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवूनही काही भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत.
बीरभूममधील दमरत गावातील मतदान केंद्राजवळ तृणमुल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. या हिंसाचारात आठ जण जखमी झाले. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन-तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उत्तर दिनाजपूरमधील सीपीआय (एम), काँग्रेसच्या कार्यालयात घुसून काही जणांनी तोडफोड केली.
या हिंसाचारासाठी काँग्रेसने तृणमुल कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे. मालदामध्ये मतदान केंद्राबाहेर सीपीआय(एम) आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.