ईडी अनिल परब यांना पाठविणार दुसरे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:27 AM2021-09-06T07:27:09+5:302021-09-06T07:27:48+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत

Second summons to be sent to ED Anil Parab | ईडी अनिल परब यांना पाठविणार दुसरे समन्स

ईडी अनिल परब यांना पाठविणार दुसरे समन्स

Next
ठळक मुद्देपरिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेल्या राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना येत्या आठवड्यात दुसरे समन्स पाठविले जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. पहिल्या समन्सला परब यांनी गैरहजर राहत मुदतवाढ मागून घेतली आहे. त्यानुसार त्यांना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चौकशीला पाचारण केले जाणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीकडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे. ईडीने गेल्या रविवारी त्यांना नोटीस बजावून ३१ ऑगस्टला ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, परब यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळवीत गैरहजर राहिले होते.

Web Title: Second summons to be sent to ED Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.