मोजणीविना परतले दुसर्यांदा पथक भूसंपादनाचा तिढा कायम: राष्ट्रीय महामार्गासाठी आज पुन्हा होणार मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 12:03 AM2016-02-23T00:03:45+5:302016-02-23T00:03:45+5:30
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील शेत जमिनीच्या मोजणीसाठी गेलेले भूमी अभिलेख कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे पथक दुसर्यांदा मोजणी न करता परत आले. जळगाव शहरच्या नावाने उतार्यावर नाव लावण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
Next
ज गाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी जळगाव तालुक्यातील ममुराबाद शिवारातील शेत जमिनीच्या मोजणीसाठी गेलेले भूमी अभिलेख कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे पथक दुसर्यांदा मोजणी न करता परत आले. जळगाव शहरच्या नावाने उतार्यावर नाव लावण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली होती. जळगाव शहराची हद्द असताना जळगाव बुद्रुकच्या नावाने मोजणी करू देणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी घेत मोजणीस नकार दिला होता. त्यानुसार २२ रोजी मोजणी करण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी मोजणीसाठी ममुराबाद शिवारात दाखल झाले. ज्या शेतकर्यांच्या जमिनीची मोजणी होणार आहे, त्या शेतकर्यांनी जळगाव शहर या नावाने जिल्हा प्रशासनाने मोजणी करावी तसेच मोजणी करतेवेळी नकाशे हे जळगाव शहराच्या नावाने असावे अशी मागणी केली. प्रशासन जो पर्यंत शेतकर्यांच्या या दोन अटी मान्य करीत नाही तोपर्यंत जमिनीची मोजणी करू देणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे. यावेळी पथकाने या मार्गावरून वहिवाट शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र या मार्गाची वहिवाट देखील सापडली नाही. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पथक थांबून होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अधिकारी मोजणीसाठी जाणार आहेत.दरम्यान, प्रातांधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी काही शेतकर्यांशी संपर्क साधला. शेतकर्यांनी मोजणी करू न दिल्यास आम्ही शेतकरी सहकार्य करीत नसल्याचा शेरा मारून मोजणीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मंगळवारी होणार्या मोजणीकडे लक्ष लागून आहे.