Twitter ने दुस-यांदा गायक अभिजीत यांची टिवटिव केली बंद
By admin | Published: May 30, 2017 07:55 AM2017-05-30T07:55:05+5:302017-05-30T08:06:01+5:30
नव्याने अकाऊंट चालू केल्यानंतर अभिजीत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी मी राष्ट्रविरोधींच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - गायक अभिजीत भट्टाचार्य यांच नवीन अकाऊंट ट्विटरने पुन्हा सस्पेंड केले आहे. @singerabhijeet हे नवीन टि्वटर अकाऊंट चालू केल्यानंतर काही तासांच्या आत टि्वटरने पुन्हा त्यांच अकाऊंट सस्पेंड केले. या अकाऊंटवर अभिजीत स्वत: टि्वट करु शकत नाहीत तसेच ते अकाऊंटही कोणाला पाहता येणार नाही. अभिजीत टि्वटरचा गैरवापर करत असून महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरत असल्याची तक्रार अनेक टि्वटर युझर्सनी केल्यानंतर मागच्या मंगळवारी टि्वटरने त्यांच अकाऊंट सस्पेंड केले होते.
नव्याने अकाऊंट चालू केल्यानंतर अभिजीत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी मी राष्ट्रविरोधींच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. हे माझे ट्विटरचे नवीन अकाऊंट आहे. जोपर्यंत माझे खरे अकाऊंट सुरु होत नाही. तोपर्यंत माझ्या या अकाऊंटला फॉलो करा. या व्यतिरिक्त माझ्या नावची सर्व ट्विटर अकाऊंट बनावट असून माझी प्रतिष्ठा खराब करत आहेत, असे अभिजीत भट्टाचार्य यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.
त्याचबरोबर, वंदे मातरम्... मी परत आलोय... राष्ट्रविरोधी माझा आवाज बंद करु शकत नाहीत... भारतीय लष्कराला सलाम. हे माझे नवीन ट्विटर अकाऊंट आहे. बाकी सर्व बनावट आहेत...अशी कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिली आहे. अभिजीत भट्टाचार्य कोणत्या-ना-कोणत्या विषयावर वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत येत होते. यावर ट्विटरच्या काही युजर्सनी सतत त्यांच्या आयडीला रिपोर्ट केले. त्यानंतर ट्विटरने याची दखल घेत अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर अकाउंटच बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान काळात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होतं असं टि्वट केले होतं. त्यांच्या या ट्विटचं अभिजीत भट्टाचार्य यांनी समर्थन केलं होतं. केवळ समर्थन नाही तर, परेश रावल यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत त्यांनी अरुंधती रॉय यांना जीपला बांधून गोळ्या घालायला हव्यात, असं ट्विट केलं होतं.