दोन महिन्यात दुसर्‍यांदा हवालाचा प्रकार उघड रेल्वे पोलिसांची हावडा एक्स्प्रेसमध्ये कारवाई : बडनेराहून सुरतला घेऊन जात होता पैसे

By Admin | Published: December 23, 2015 12:18 AM2015-12-23T00:18:27+5:302015-12-23T00:18:27+5:30

हॅलोग्रामीणसाठीफोटो-२३सीटीआर०६

For the second time in two months, the hawala type was revealed by the Railway Police in Howrah expressway: taking money from Badnera to Surat | दोन महिन्यात दुसर्‍यांदा हवालाचा प्रकार उघड रेल्वे पोलिसांची हावडा एक्स्प्रेसमध्ये कारवाई : बडनेराहून सुरतला घेऊन जात होता पैसे

दोन महिन्यात दुसर्‍यांदा हवालाचा प्रकार उघड रेल्वे पोलिसांची हावडा एक्स्प्रेसमध्ये कारवाई : बडनेराहून सुरतला घेऊन जात होता पैसे

googlenewsNext
लोग्रामीणसाठीफोटो-२३सीटीआर०६
जळगाव : रेल्वे स्थानकावर
अप हावडा अहमदाबाद एक्स्प्रेसच्या एस- १ डब्यातून रणजित ठाकूर (वय २२) रा.पालेज ठाकूरवास ता.जि.मेहसाना (गुजरात) या संशयीत प्रवाशाकडून २२ लाखांची हवालाच्या व्यवहाराची रक्कम जप्त करण्यात आली़ दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. ६ नोव्हेंबर रोजीही शहरात हवालाचा व्यवहार उघडकीस आला होता. आता पुन्हा रेल्वे स्टेशनवर हवालाचा व्यवहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
रणजित ठाकूर याच्याकडून रक्कम जप्त करण्यात आली असून न्यायालयाने गुन्‘ाचा तपास करण्यास परवानगी दिल्याची माहिती लोहमार्गचे निरीक्षक ए़जे़महाजन यांनी दिली़
जनरलचे तिकीट, बसला आरक्षित डब्यात
जळगाव रेल्वे पोलिसातील कर्मचारी मध्यरात्री नियमीत तपासणी करीत होते. या वेळी हावडा-अहमदाबाद (क्र १०८३४, अप) या अहमदाबादकडे जाणार्‍या गाडीची तपासणी करताना पथकाला एस-१ डब्यात दरवाजानजीक उभा असलेला रणजित ठाकूर नामक युवक काळी बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्याची चौकशी केली असता त्याने आपल्याकडे जनरलचे तिकीट आहे. पण जनरलच्या डब्यात जागा नसल्याने आपण आरक्षित डब्यात बसल्याचे सांगितले.
बडनेरा येथून बसला, सुरतेत पैसे नेत होता
संबंधित युवक बडनेरा येथून पैसे घेऊन बसला. है पैसे तो सुरत येथील नीलकंठ ॲण्ड कंपनी यांच्याकडे नेत होता. त्याने पैसे वर्तमान पत्राच्या कागदांमध्ये गुंडाळून टेप लावलेली होती. तपासणी पथकातील सहायक फौजदार ए.के.तिवारी, कर्मचारी बी.एस.सोनवणे, दिलीप बारी, रवींद्र बाविस्कर, एल.डी.पाटील, रंगलाल जाधव, डी.के.सोनवणे, सुनील बोरसे, नीलेश अडकात आदींनी त्यास रेल्वे डब्यातून ताब्यात घेतले होते.
जळगाव पोलीस ठाण्यात आणले
रेल्वे गाडी जळगाव स्टेशनवर आल्यानंतर संबंधित युवकास जळगाव रेल्वे ठाण्यात आणण्यात आले. विनापरवानगी पैसे नेत असल्याचे लक्षात घेता त्याच्याकडील पैसे ताब्यात घेण्यात आले. रेल्वेचे उपनिरीक्षक श्रीप्रकाश यादव यांच्यासह लोहमार्ग पोलिसातील निरीक्षक आनंद महाजन यांनी त्याची चौकशी केली.
पैसे हवालाचे असल्याचा पोलिसांचा दावा
ठाकूर याच्याकडे असलेले पैसे पोलिसांनी ताब्यात घेऊन ते जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात मोजून घेतले. ते २२ लाख रुपये आहेेत. है पैसे ठाकूर हा विनापरवानगी नेत होता. प्राथमिक चौकशीत हे पैसे हवालाचे असल्याचे रेल्वे उपनिरीक्षक श्रीप्रकाश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग
संबंधित आरोपीवर विनापरवानगी वस्तू बाळगून ती नेत असल्याप्रकरणी कलम ४१, १ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाईसाठी त्यास लोहामार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
कापूस व्यापार्‍याची रक्कम : प्रवासी
प्रवाशाकडील रक्कम हवाल्याची असल्याची चर्चा असलीतरी ही रक्कम कापूस व्यापारी मितेश पटेल (गुजरात) यांची असल्याची माहिती ठाकूर याने लोहमार्ग पोलिसांना दिली़ अमरावती येथून दोन व अकोला येथून २० लाख रुपये कापसाचे पेमेंट घेतल्याने ते घेऊन जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याचे निरीक्षक महाजन म्हणाले़ संशयीत प्रवाशाविरुद्ध मुंबई पोलीस ॲक्ट १२४ (मालकी हक्क साबीत न करू शकल्याने) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़
लोहमार्गचे पोलीस निरीक्षक आनंदा महाजन, उपनिरीक्षक शब्बीर शेख, शैलेश पाटील, राजेश पाटील, हिरा चौधरी आदींनी आरोपीला ताब्यात घेतले़
आरोपीची जामिनावर सुटक
आरोपी रंजीत ठाकूर यास भुसावळ न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली तर सीआरपीसी १५५ (३) प्रमाणे पोलिसांना या गुन्‘ाचा अधिक तपासाची परवानगी देण्यात आली़ जप्त केलेली रक्कम लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे़ तिच्या मालकी हक्काचे पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने रक्कम संबंधितास परत केली जाईल, अशी माहिती निरीक्षक महाजन यांनी दिली़
कोट-
अवैध मार्गाने रक्कम नेली जात असल्याच्या संशयावरून रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली़ अधिक कारवाईसाठी आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे़
-चंद्रमोहन मिश्रा,
विभागीय सुरक्षा आयुक्त,
रेल्वे सुरक्षा बल

Web Title: For the second time in two months, the hawala type was revealed by the Railway Police in Howrah expressway: taking money from Badnera to Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.