समलैंगिकतेवर आणलेल्या विधेयकाचा लोकसभेत दुस-यांदा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 09:03 PM2016-03-11T21:03:53+5:302016-03-11T21:29:03+5:30
समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेतून वगळावे यासाठी काँग्रेस नेते शशी थरुर यांनी लोकसभेत आणलेले विधेयक दुस-यांदा नामंजूर झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेतून वगळावे यासाठी काँग्रेस नेते शशी थरुर यांनी लोकसभेत आणलेले विधेयक दुस-यांदा नामंजूर झाले. तीन महिन्यात दुस-यांदा या विधेयकाचा लोकसभेत पराभव झाला.
समलैंगिकतेला गुन्हेगारी कृत्य ठरवणारे भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ मध्ये सुधारणा करावी अशी मागणी या विधेयकाव्दारे थरुर यांनी केली होती. ७३ पैकी ५८ सदस्यांनी या विधेयकाविरोधात मतदान केले.
फक्त १४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले. यापूर्वी १८ डिसेंबरला थरुर यांनी हे विधेयक चर्चेला आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी सुद्धा लोकसभेत या विधेयकाचा पराभव झाला होता.