‘त्या’ गुप्त फाईल सार्वजनिक

By admin | Published: September 19, 2015 02:31 AM2015-09-19T02:31:38+5:302015-09-19T08:31:33+5:30

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्स पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी सार्वजनिक केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून लॉकरमध्ये बंद असलेल्या या गोपनीय

The 'secret' file is public | ‘त्या’ गुप्त फाईल सार्वजनिक

‘त्या’ गुप्त फाईल सार्वजनिक

Next

कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्स पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी सार्वजनिक केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून लॉकरमध्ये बंद असलेल्या या गोपनीय फाईल्स खुल्या झाल्याने नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने नेताजींबाबतच्या फाईल सार्वजनिक केल्यानंतर आता केंद्रानेही आपल्याकडील नेताजींसंदर्भातील दस्तऐवज उघड करावेत, अशी मागणी होत असून केंद्र सरकारवरील दबाव वाढला आहे.
प. बंगाल सरकारने या फाईल्स सामान्यांसाठी खुल्या केल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी १२,७४४ पानांच्या ६४ फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या. नेताजींच्या कुटुंबातील सदस्य यावेळी हजर होते. या फाईल्स कोलकाता पोलीस संग्रहालयात काचेच्या पेटीत प्रदर्शित केल्या जातील. सोमवारपासून सामान्य जनता त्या बघू शकेल, असे शहर पोलीस आयुक्त सुरजित कार पुरकायस्थ यांनी सांगितले. या फाईल्सची डिजिटल प्रत अर्थात डीव्हीडी नेताजींच्या कुटुंबियांना सोपवण्यात आली आहे. या फाईल्स १९३७ ते १९४७ दरम्यानच आहे. काही हस्तलिखित नोट्स, नेताजी आणि त्यांचे बंधू शरत्चंद्र यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे यात आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, या फाईल्समधून नेताजी किमान १९६४ पर्यंत जिवंत असल्याची माहिती मिळते. सन १९६० च्या दशकात अमेरिकेने तयार केलेला एक अहवालही यात आहे. नेताजी फेबु्रवारी १९६४ मध्ये भारतात परतले होते, असा हा अहवाल सांगतो. १९४५ मध्ये नेताजी अचानक बेपत्ता झाले होते. १७ आॅगस्ट १९४५ रोजी ते बँकॉक विमानतळावर अखेरचे दिसले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात नेताजींचा कथित मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र याचे कुठलेही पुरावे नाहीत. मुखर्जी आयोगाने तैवानमधील विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे मत फेटाळले होते. त्यानंतर नेताजींचे लहान बंधू आणि नेताजी चौकशी समितीचे एक सदस्य सुरेश बोस यांनी नेताजींचा मृत्यू १९७२ मध्ये झाल्याचे शपथेवर सांगितले होते. यानंतरही आजतागत नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

Web Title: The 'secret' file is public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.