Section 377 : समलैंगिकतेच्या निर्णयावर पुढील सुनावणी 17 तारखेला होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:02 PM2018-07-12T16:02:55+5:302018-07-12T16:17:34+5:30
समलैंगिक संबंधाविषयीचे कलम 377 वर पुढील सुनावणी येत्या 17 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे. समलैंगिकतेतील संबंधाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टने यासंबंधीचा निर्णय पुढे ढकलला आहे.
नवी दिल्ली : समलैंगिक संबंधाविषयीचे कलम 377 वर पुढील सुनावणी येत्या 17 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे. समलैंगिकतेतील संबंधाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टने यासंबंधीचा निर्णय पुढे ढकलला आहे.
समलैंगिकता हा कायदान्वये गुन्हा असल्याचे कलम 377 मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. काल यासंदर्भात सुनावणी झाली. यावेळी प्रौढ व्यक्तींनी ऐकमेकांच्या सहमतीने ठेवलेले संबंध गुन्हा नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. तसेच कलम 377 वैध आहे की नाही याबाबत अभ्यास सुरु असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. मात्र, आज झालेल्या सुनावणीत यांदर्भात कोणताही अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आला नसून यावरील पुढील सुनावणी आता 17 जुलैला करण्यात येणार आहे.
Supreme Court to resume hearing petitions against Section 377 of the Indian Penal Code (IPC), which criminalises homosexual activities, on July 17 (Tuesday).
— ANI (@ANI) July 12, 2018
दरम्यान, याबाबत केंद्र सरकारने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यावतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये सांगितले, की कलम 377 वर आता कोर्टानेच निर्णय घ्यावा. आम्ही याबाबतचा संपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाकडे सोपविला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे कलम 377 बाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या खंडपीठात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा, आरएफ नरीमन, एएम खानविलकर, डीवाय चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे.