मोदींच्या जिवाला धोका, मऊमधील सभेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था
By admin | Published: February 26, 2017 10:20 PM2017-02-26T22:20:27+5:302017-02-26T22:20:27+5:30
सोमवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी दहशतवाद्यांकडून पंतप्रधानांच्या जिवाला असलेल्या संभाव्य धोका विचारात घेऊन
Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 26 - सोमवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी दहशतवाद्यांकडून पंतप्रधानांच्या जिवाला असलेल्या संभाव्य धोका विचारात घेऊन गुप्तहेर संघटनांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या सभेदरम्यान मोदींवर रॉकेट लॉन्चर आणि स्फोटकांनी भरलेल्या वाहनांच्या सहाय्याने हल्ला होण्याची भीती गुप्तहेर संघटनांनी वर्तवली आहे. त्यामुळे मऊ येथे सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
या वृत्ताला मऊचे अॅडिशनल एसपी आर.के. सिंग यांनी दुजोरा दिला आहे. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येचा आरोपी रसूल पाटी हा पंतप्रधानांवर हल्ला करण्याची योजना आखत आहे. रसूल पाटी आणि त्याचे दोन सहकारी पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला करण्याची योजना आखत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सभेपूर्वी सुरक्षाव्यवस्था चोख करण्यात आली आहे. अशी माहिती आर.के.सिंग यांनी दिली. गेल्या काही वर्षांत इथून काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आजही या विभागात दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या लोकांचे अस्तित्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Rasool Pati, associates planning to attack PM's cavalcade with rocket launcher/vans with explosives, security enhanced: Mau ASP, RK Singh pic.twitter.com/XvGnOy7H4d
— ANI (@ANI_news) February 26, 2017