सरन्यायाधीशांनी घेतली सुरक्षेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 07:34 AM2019-11-09T07:34:29+5:302019-11-09T07:34:44+5:30
मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांशी चर्चा; एक तास बैठक
नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रामजन्मभूमी प्रकरणाच्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात देण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांकडून त्या राज्यातील सुरक्षाव्यवस्थेची शुक्रवारी एका बैठकीदरम्यान माहिती घेतली.
सरन्यायाधीशांच्या दालनात सुमारे एक तास ही बैठक सुरू होती. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत राहाण्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे असे त्या राज्याचे मुख्य सचिव राजेंद्रकुमार व पोलीस महासंचालक ओमप्रकाश सिंह यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याचा तपशील मात्र कळू शकलेला नाही. रामजन्मभूमी खटल्यात सलग ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर त्याचा निकाल १६ आॅक्टोबरपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून त्याआधीच ते या वादग्रस्त प्रकरणाच्या खटल्याचा निकाल देणार आहेत.
दोन हेलिकॉप्टर सज्ज
च्रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या आधी व नंतर उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
च्त्याचाच भाग म्हणून सुरक्षादलांच्या तातडीच्या मदतीसाठी लखनऊ व अयोध्या याठिकाणी दोन हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. ही माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिली. त्यांनी
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व आयएएस अधिकाऱ्यांशी गुरुवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.