सुरक्षा दल अॅक्शन मोडमध्ये, काश्मीरप्रमाणे नक्षलग्रस्त भागातही ऑपरेशन करण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 01:20 PM2021-11-02T13:20:45+5:302021-11-02T13:20:53+5:30

गृह मंत्रालयाने सांगिल्यानुसार, मागील काही वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये 70 टक्के घट झाली आहे.

Security forces in action mode, preparing to conduct operations in Naxal-affected areas like Kashmir | सुरक्षा दल अॅक्शन मोडमध्ये, काश्मीरप्रमाणे नक्षलग्रस्त भागातही ऑपरेशन करण्याची तयारी सुरू

सुरक्षा दल अॅक्शन मोडमध्ये, काश्मीरप्रमाणे नक्षलग्रस्त भागातही ऑपरेशन करण्याची तयारी सुरू

Next

नवी दिल्ली:छत्तीसगड आणि झारखंड सारख्या राज्यांच्या नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांकडून काश्मीर सारखे ऑपरेशन्स केले जाणार आहे. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा संपल्यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बाधित भागात मोठ्या कारवाईला मंजुरी दिली आहे. पावसाळ्यात ऑपरेशन करणे धोकादायक होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे सुरक्षा दल पावसाळा संपण्याचीच वाट पाहत होते.

सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्त वाहिनीलाला सांगितले की, “पावसाळयाचा हंगाम संपल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी विशेष दल(COBRA) आणि प्रभावित क्षेत्राच्या प्रमुखांना नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी संदेश पाठवला आहे. या कारवाया काश्मीरमध्ये केल्या जातात त्याच पद्धतीने चालू राहतील. मोहिमेत लवकरच अनेक मोठ्या कारवाया केल्या जाणार आहेत.

दुसरीकडे, नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या आयटीबीपी आणि सीआयएसएफसारख्या इतर निमलष्करी दलांनाही नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आणि कारवाई करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे केंद्राचे उच्च अधिकारीही या रेड झोन भागांना भेट देतील आणि सुरक्षा दलांच्या सज्जतेची चाचणी घेतील. केंद्र सरकारच्या इराद्याबाबत स्थानिक पोलिसांनाही कळवण्यात आले आहे.

नक्षलवादी घटनांमध्ये घट
या वर्षाच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने संसदेत सांगितले होते की, नक्षली घटना 70 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 2009 मध्ये 2,258 घटना घडल्या होत्या, तर 2020 मध्ये त्यांची संख्या 665 वर आली आहे. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले होते की, सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलातील जवानांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही 82 टक्क्यांनी घट झाली आहे. 2010 मध्ये अशा प्रकरणांची संख्या 1,005 होती, ती 2020 मध्ये 183 वर आली आहे.

 
 

Web Title: Security forces in action mode, preparing to conduct operations in Naxal-affected areas like Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.