अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 07:51 AM2019-04-25T07:51:11+5:302019-04-25T07:54:18+5:30
जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनागमधल्या बिजबेहरामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या 3 आरआर आणि एसओजीच्या संयुक्त टीमनं गुरुवारी सकाळी हाऊन बंदर मोहल्ला परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं.
या टीमला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांची संयुक्त टीम सर्च ऑपरेशन राबवत होती, त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूनं गोळीबार सुरू होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं. दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित आहेत.
#UPDATE: Two terrorists have been neutralised in the exchange of fire with security forces in Bagender Mohalla of Bijbehara in South Kashmir's Anantnag district. Search operation is underway. https://t.co/Yl41By46fM
— ANI (@ANI) April 25, 2019
सुरक्षा दलाच्या जवानांचं ऑपरेशन ऑलआऊट जारी
तत्पूर्वी 20 एप्रिलला दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. सोपोरमधल्या वाटरगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. 13 एप्रिलला शोपियानमध्ये लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. 6 एप्रिलला शोपियानमधल्या इमाम साहिब भागातही दोन दहशतवाद्यांना मारलं होतं. 28 मार्चलाही सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियान आणि हंदवाडामध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
Jammu & Kashmir: Visuals from Bagender Mohalla of Bijbehara in Anantnag where two terrorists were neutralized in an encounter with security forces. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/G9JYNFoGXh
— ANI (@ANI) April 25, 2019