सुरक्षा दलांकडून दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; 3 दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:06 AM2022-05-03T10:06:56+5:302022-05-03T10:07:29+5:30
या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी 29 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे संयुक्त मोबाईल व्हेईकल चेक पोस्ट (MVCP) तैनात करण्यात आल्या होत्या.
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सोमवारी भारतीय लष्करासह एका संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि सोपोरमधील हैगुम गावातून तीन दहशतवाद्यांना पकडण्यात यश मिळविले. लष्कर-ए-तैयबाचे हे तीन दहशतवादी गैर-स्थानिक मजुरांना ठार मारण्याचा आणि केंद्रशासित प्रदेशात अनेक ठिकाणी ग्रेनेड हल्ले करण्याचा कट रचत होते.
एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, विविध ठिकाणांहून संशयितांच्या चौकशीतून जम्मू-काश्मीरमधील हत्यांमागे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची भूमिका स्पष्ट झाली आहे. दहशतवादी संघटना सर्वसामान्य परिसरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची योजना आखत असल्याची माहितीही मिळाली असून त्यासाठी लष्कराच्या या तीन दहशतवाद्यांना हे काम सोपवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत सुरक्षा दलांनी 2 मे रोजी सोपोरच्या सामान्य भागातून श्रीनगरपर्यंत तिघांच्या हालचाली रोखल्या.
J&K | Indian Army & Jammu and Kashmir police busted a terror module of the Lashkar-e-Taiba (LeT) & arrested three terrorists from Sopore's Haigam village. They were planning to orchestrate killings of non-local labourers & grenade attacks in multiple locations: J&K Police (02.05) pic.twitter.com/56Y6XGTP2g
— ANI (@ANI) May 3, 2022
या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी 29 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे संयुक्त मोबाईल व्हेईकल चेक पोस्ट (MVCP) तैनात करण्यात आल्या होत्या. प्रसिद्धीपत्रकानुसार, 02 मे 22 च्या रात्री हैगुमच्या सामान्य भागात तीन व्यक्ती बागेत संशयास्पदरित्या फिरताना दिसल्या. लुकआउट पार्टीने 29 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त मोबाइल वाहन चेक पोस्टला सतर्क केले. सुरक्षा दलांनी या तिघांना आव्हान दिले, तरीही ते कॉमन एरियातील बागांच्या दिशेने पळून गेले. एमव्हीसीपीने या तिघांचा पाठलाग केला आणि बाहेर जाण्याच्या महत्त्वाच्या मार्गांवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी त्यांना पकडले.
दरम्यान, तफीम रियाझ, सीरत शाबाज मीर आणि रमीझ अहमद खान अशी अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्या झडतीत 3 चायनीज पिस्तूल आणि दारुगोळा आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. सुरक्षा दलांनी सांगितले की, या यशस्वी ऑपरेशनमुळे मोठे दहशतवादी कट उधळण्यात आणि बिगर स्थानिक मजुरांच्या लक्ष्यित हत्येमागील मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात मदत होईल.