अतिरेक्यांविरोधात सुरक्षा दलाची मोहीम; पूंछ, राजौरीत इंटरनेट बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 05:50 AM2023-12-24T05:50:30+5:302023-12-24T05:51:23+5:30

पूंछ व राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

security forces campaign against militants internet shutdown in poonch rajouri | अतिरेक्यांविरोधात सुरक्षा दलाची मोहीम; पूंछ, राजौरीत इंटरनेट बंद

अतिरेक्यांविरोधात सुरक्षा दलाची मोहीम; पूंछ, राजौरीत इंटरनेट बंद

पूंछ ( Marathi News ): लष्कराच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने मोहीम हाती घेतली आहे. त्याचदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमुळे तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पूंछ व राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

अतिरेक्यांच्या हल्ल्यात पाच जवानांचा मृ्त्यू झाल्याप्रकरणात चौकशीसाठी बोलाविलेल्या तीन संशयितांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात तणाव वाढला आहे. समाज कंटकांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दोन्ही जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद केली, तसेच संवेदनशील परिसरात बंदोबस्तही वाढविला आहे. दरम्यान, तीन संशयितांच्या मृत्यूच्या चौकशीत सहकार्य करण्यात येईल, असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले.
 

Web Title: security forces campaign against militants internet shutdown in poonch rajouri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.