जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 05:49 PM2024-09-11T17:49:19+5:302024-09-11T17:58:03+5:30

जम्मू-काश्मीरमधील कठुआ-उधमपूर सीमेवर लष्कराच्या पथकाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Security forces encounter in Kathua, Jammu and Kashmir; Three terrorists killed | जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu & Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा दहशतवाद्यांविरुद्ध मोहिम उघडली आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील कठुआ येथे बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांकडून अजूनही दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर निवडणुकीपूर्वी खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ-उधमपूर सीमेवर लष्कराच्या पथकाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बसंतगडमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या एका गटाची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांचे संयुक्त पथक खांद्रा टॉपच्या दिशेने गेले तेव्हा ही चकमक झाली. या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी रात्री १२.५० च्या सुमारास शोध पथकावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. गोळीबार सुरु होताच अतिरिक्त फौजा वनक्षेत्रात पाठवण्यात आल्या होत्या.

दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. ज्या अंतर्गत सुरक्षा दलांनी कठुआ येथे चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार केले. ही कारवाई अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या १ पॅरा, २२ गढवाल रायफल्स आणि केंद्रशासित प्रदेश पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांचा समावेश आहे.

दरम्यान, याआधी जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या बेछूट गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या बीएसएफने सांगितले की, या घटनेनंतर सैनिक हाय अलर्टवर आहेत. या सीमेचा विस्तार अंदाजे ३,३२३ किलोमीटरपर्यंत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांना वेगवेगळ्या पातळीवरील तणाव आणि सुरक्षा आव्हाने वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली गेली आहेत.

Web Title: Security forces encounter in Kathua, Jammu and Kashmir; Three terrorists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.