सुरक्षा रक्षक चौकट

By admin | Published: December 20, 2014 10:28 PM2014-12-20T22:28:16+5:302014-12-20T22:28:16+5:30

चौकट

Security guard window | सुरक्षा रक्षक चौकट

सुरक्षा रक्षक चौकट

Next
कट
वाहने धुण्याचे काम
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकाला कमी वेतन दिले जाते. त्याला इमारतीमधील वाहने धुण्याचे काम दिले जाते व त्यामधून पैसे कमविण्यास सांगण्यात येते. इमारतीमध्ये पाणी सोडणे व पाणी बंद करण्याचे कामही सुरक्षा रक्षकच करत असतात. याशिवाय काही ठिकाणी इमारतीमधील रहिवाशांना भाजीपासून इतर वस्तू दुकानातून आणून देण्याचे कामही त्यांनाच सांगितले जात असल्यामुळे सुरक्षा रक्षक फक्त नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरक्षा रक्षकच करतात चोर्‍या
शहरात अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच चोर्‍या करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा रक्षक नेमताना त्याचे नाव, पत्ता, चारित्र्य पडताळणी केली जात नाही. अधिकृत एजन्सीकडून सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली जात नसल्यामुळे अशाप्रकारच्या घटना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांनी पैसे वाचविण्यासाठी बोगस एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेवू नये अशा सुचनाही पोलिसांनी केल्या आहेत.

प्रतिक्रिया
गृहनिर्माण सोसायट्यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. वेळोवेळी सुचना दिल्या आहेत परंतू सोसायट्यांचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी फक्त नावाला सुरक्षा रक्षक नेमले असून त्यांच्यामध्ये सुरक्षा करण्याची क्षमताच नसते. नागरिकांनी सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
सुरेश मेंगडे
पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा

फोटो
२०खारघर हत्या मिनाक्षी जैसवाल.
बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांच्या हत्या झालेल्या इमारतीचा फोटो आहे. मुख्य बातमीत न वापरल्यास त्या इमारतीचा फोटो या बातमीला घेता येईल.

Web Title: Security guard window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.