पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या मदरशांना लष्करी सुरक्षा, मदरशातील मुलाने सांगितली 'अनटोल्ड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 10:25 AM2019-03-05T10:25:42+5:302019-03-05T10:27:59+5:30

भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले,

security for Jaish-e-Mohammed's madrashas by pakistani Army, son of madarasa, told 'Untold Story' | पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या मदरशांना लष्करी सुरक्षा, मदरशातील मुलाने सांगितली 'अनटोल्ड स्टोरी'

पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या मदरशांना लष्करी सुरक्षा, मदरशातील मुलाने सांगितली 'अनटोल्ड स्टोरी'

googlenewsNext

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. त्यानंतर, या एअर स्ट्राईकवरुन देशात चांगलंच राजकारण सुरू झालं. तर अनेकांनी या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले किंवा, एअर स्ट्राईक झाला की नाही, असेही प्रश्न उपस्थित केले. मात्र, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही तासांतच बालकोट येथील जैश ए मोहम्मदच्या मदरशांतून तेथील मुलांना पाकिस्तानी लष्कराने सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. 

भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यावेळी त्या भागात 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह होते, अशी आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे हे फोन अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली होती. एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची चर्चा सुरू असताना ही आकडेवारी पुढे आली. त्यानंतर, आता भारतीय वायू सेनेनं लक्ष्य केलेल्या तळांवर असलेल्या मदरशातील मुलांना हल्ल्यानंतर काही तासांतच सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बालाकोट येथील तलिम-उल-कुराण या जैश ए मोहम्मदच्या मदरशांतील काही मुलांना लगेचच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यानंतर, काही दिवसांनी त्यांना त्यांच्या घरी ठेवण्यात आल्याची माहिती, या मुलांच्या नातेवाईंकांनी दिली आहे. 

भारतीय वायू सेनेने 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारतीय वायू सेनेनं हा हल्ल्या करण्यापूर्वीच एक आठवडाअगोदर या मदरशांना पाकिस्तानी सैन्यानं सुरक्षा दिली होती, असे येथील लहान मुलाने सांगितले. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानकडून या मदरशांना संरक्षण पुरविण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. 
26 फेब्रवारी रोजी मध्यरात्री मोठा आवाज झाला. या आवाजाने आम्ही झोपेतून जागे झालो. हा हल्ला आमच्या मदरशापासून जवळच झाला होता. त्यानंतर, सकाळीच पाकिस्तानी सैन्याने आम्हाला एकत्र घेऊन एका सुरक्षित स्थळी नेले आणि काही दिवसांनी आमच्या घरी नेऊन साडले, असेही या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.  
 

Web Title: security for Jaish-e-Mohammed's madrashas by pakistani Army, son of madarasa, told 'Untold Story'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.