"वंदे भारत" स्लीपरमध्ये कसे असतील बर्थ? समोर आली पहिली झलक, लुक बघून व्हाल खूश!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:52 PM2023-10-02T13:52:29+5:302023-10-02T13:53:03+5:30
प्रत्येक कोचमध्ये असेल मिनी पॅन्ट्री...
संपूर्ण देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची जबरदस्त चर्चा सुरू आहे. नव्हे, भारतातील ही सेमी हाय स्पीड ट्रेन सध्या भारतीय रेल्वेची शान बनली आहे. महत्वाचे म्हणजे, सर्वच भागांतील खासदार मंडळी या ट्रेनची मागणी घेऊन रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचत आहेत. या ट्रेनमध्ये सध्या केवळ चेअर कारची व्यवस्था आहे. अर्थात प्रवाशांना बसून प्रवास करावा लागतो. यामुळे ही ट्रेन सध्या लांब पल्ल्यांसाठी सुरू करण्यात आलेली नीही. मात्र आता लवकरच ही ट्रेन लांब पल्ल्यांवरही धावेल. यासाठी रेल्वे मंत्रालय लवकरच वंदे भारत स्लीपर सुरू करण्याच्या तयारीत आहे. यातील बर्थ कसे असतील? याची झलकही आता समोर आली आहे.
असा आसेल वंदे भारतचा स्लीपर लुक, प्रवाशांसाठी असतील 823 बर्थ -
वंदे भारतच्या स्लीपर बर्थचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोलले जाते की, या ट्रेनच्या पहिल्या व्हर्जनमध्ये एकूण 857 बर्थ असतील. यांपैकी 34 सीट्स स्टाफसाठी असतील. अर्थात प्रवाशांसाठी एकूण 823 बर्थ असतील. यासाठी डिझाईनदेखील निश्चित करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत बाहेर पडू शकते, असेही बोलले जात आहे.
प्रत्येक कोचमध्ये असेल मिनी पॅन्ट्री -
सध्या लांब पल्ल्यांच्या स्लीपर मेल अथवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये स्वतंत्र पॅन्ट्री डब्याची व्यवस्था असेत. मात्र, असे वंदे भारतमध्ये नसेल. कारण वंदे भारतच्या प्रत्येक कोचमध्ये एक मिनी पॅन्ट्री असणार आहे. या पॅन्ट्रीद्वारे केवळ संबंधित डबातील प्रवाशांनाच खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जाईल. महत्वाचे म्हणजे, या पेन्ट्रीमुळे आता प्रत्येक डब्यात चार ऐवजी तीनच स्वच्छतागृहे असतील, असे सांगण्यात येत आहे.
🚨 First Look of Vande Bharat Trains Sleeper Version. pic.twitter.com/LP19U2eAU0
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) October 1, 2023