समाजसेवेचे बीज अध्यात्मात : चैतन्य महाराज
By admin | Published: April 26, 2015 10:20 PM2015-04-26T22:20:33+5:302015-04-26T22:44:50+5:30
नाशिक : समाजातील विविध संस्था वा व्यक्तींकडून समाजसेवेचे महत्तम कार्य केले जाते़ या व्रताचे अर्थात समाजसेवेची बिजे अध्यात्मात असल्याचे प्रतिपादन श्रीराम शक्तिपीठाचे सोमेश्वर चैतन्य महाराज यांनी केले़ शरणपूररोडवरील मॉडर्न पॉईंट येथील प्रेरणा-एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़

चैतन्य महाराज पुढे म्हणाले की, समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट होऊन सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी संत, महापुरुषांनी महत्तम कार्य केले आहे़ युवकांनी आपली आध्यात्मिक परंपरा व महान व्यक्तींच्या चरित्राचा अभ्यास करून स्वत:मध्ये तसेच समाजामध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही महाराजांनी यावेळी केले़
यावेळी श्रीराम शक्तिपीठाचे सिद्धिनाथ महाराज, संस्थेचे शरद सोनवणे, प्रदीप परदेशी, कैलास दराडे, विष्णू नागवंशी, दीपक गवळी, योगेश देशमुख, उल्हास बोरसे, मनोज चौधरी, सुरज वाडकर, मेधना अहिरे, नवनाथ गवळी, दीपक गोसावी, विलास बोरसे आदि उपस्थित होते़
(प्रतिनिधी)