मोदींवरील चित्रपटाचा ट्रेलर पाहून विवेक ओबेरायची उडविली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:57 AM2019-03-23T05:57:44+5:302019-03-23T05:58:01+5:30

ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, ५ एप्रिल रोजी, नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित होत असून, त्याचा ट्रेलर रीलिज होताच सोशल मीडियावरून त्याची खिल्ली उडविली जात आहे.

Seeing Vivek Oberoi's groan after watching a movie trailer on Modi | मोदींवरील चित्रपटाचा ट्रेलर पाहून विवेक ओबेरायची उडविली खिल्ली

मोदींवरील चित्रपटाचा ट्रेलर पाहून विवेक ओबेरायची उडविली खिल्ली

Next

नवी दिल्ली  - ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, ५ एप्रिल रोजी, नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित होत असून, त्याचा ट्रेलर रीलिज होताच सोशल मीडियावरून त्याची खिल्ली उडविली जात आहे. निवडणुकांच्या काळात नरेंद्र मोदींवरील चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालावी, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळावर हा चित्रपट असल्याने त्याचे नाव ‘पीएम नरेंद्र मोदी’ का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

चित्रपटात मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेराय याने केली असून, तो कोणत्याही अँगलमधून नरेंद्र मोदींसारखा दिसत नाही, असा आक्षेप बऱ्याच जणांनी घेतला. विवेकपेक्षा मोदी हेच अधिक चांगले अभिनेते आहेत, असा काहींनी टोला लगावला. मोदी आता प्रचारासाठी चित्रपटाचाही वापर करू लागले, असेही टिष्ट्वट एकाने केले.

ट्रेलर पाहिल्यावर दूरदर्शनवरील लो बजेट मालिकांची आठवण येते, असे एकाने टिष्ट्वट केले आहे. त्यांची (मोदी यांची) डिग्री नकली निघाली होती, पण हा चित्रपटही नकली दिसतोय, असे दुसऱ्याने टिष्ट्वट केले. हा चित्रपट म्हणजे २0१९ सालचा विनोदी चित्रपट (बेस्ट कॉमेडी आॅफ २0१९) असेल, अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली. अनेकांनी चित्रपटाच्या ट्रेलरमधील विवेकच्या छायाचित्रावर ‘चौकीदार चोर हैं’ अशी प्रतिक्रिया लिहिली आहे.
काहींनी विवेकच्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ चित्रपटाचे पोस्टर या ट्रेलरच्या निमित्ताने टिष्ट्वट केले. एकाने या चित्रपटाची तुलना सध्या तुरुंगात असलेल्या बाबा राम महिमशी केली. एकाने म्हटले आहे की, हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा. ज्यांनी मते कोणाला
द्यायची, हे अद्याप ठरवलेले नाही,
तेही हा चित्रपट पाहून भाजपाला सत्तेतून बाहेर घालवतील. एकाने तर विवेक ओबेराय कायमच गँगस्टरची भूमिका उत्तम करतात, असा टोला लगावला आहे.
या चित्रपटात मी गाणी लिहिलेली नाहीत. ट्रेलरच्या शेवटी माझे नाव पाहून मी चकित झालोय, अशी प्रतिक्रिया गीतकार जावेद अख्तर यांनी दिली आहे. हे टिष्ट्वट करताना त्यांनी ट्रेलरच्या शेवटची नामावलीही दिली आहे.

आचारसंहितेचा भंग?

हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित केल्यास आचारसंहितेचा भंग होईल, असे काही राजकीय पक्षांनी म्हटले आहे, पण चित्रपट कधी प्रदर्शित करावा, यावर निवडणूक आयोगाची बंधने नाहीत, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी म्हणाले आहे. द्रमुकने तर निवडणुका होईपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्यास आयोगाने मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

इथे आहे पत्रकार परिषद?
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटले आहे की, किमान या चित्रपटात तरी मोदी यांची एखादी पत्रकार परिषद दाखविली असेल, अशी आशा करू या!

Web Title: Seeing Vivek Oberoi's groan after watching a movie trailer on Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.