विकास, विशाल, सुखदेवच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब
By admin | Published: August 17, 2015 11:31 PM2015-08-17T23:31:05+5:302015-08-17T23:31:05+5:30
या देशात ‘केवळ गुन्हेगारच न्यायासाठी रडतात’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नितीश कटारा हत्याकांडातील आरोपी विकास यादव
Next
नवी दिल्ली : या देशात ‘केवळ गुन्हेगारच न्यायासाठी रडतात’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नितीश कटारा हत्याकांडातील आरोपी विकास यादव, विशाल यादव आणि सुखदेव पहिलवान या तिघांना दोषी ठरविण्याचा निर्णय उचित ठरविला. तथापि ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेचा कालावधी कमी करण्याच्या विनंतीवर विचार करण्याची तयारी दर्शविली.
आरोपींनी केलेला गुन्हा हा जाणीवपूर्वक केलेला कट होता, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने या तिन्ही आरोपींना दोषी ठरविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.