तब्येत ठीक होताच सीमा हैदर आणि सचिनला ATS नं उचललं; असं आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 04:23 PM2023-07-25T16:23:09+5:302023-07-25T16:27:42+5:30
सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांची ही कहाणी अद्यापही एटीएसला पचलेली नाही.
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची प्रेम कहाणी आता सर्वांनाच माहीत आहे. सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांची ही कहाणी अद्यापही एटीएसला पचलेली नाही. या दोघांची तब्येत बरीहोताच एटीएसने मंगळवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी उचलले आहे. खरे तर, सीमाची पाकिस्तानातून भारतात पोहोचण्याची ही कहाणी गुप्तचर संस्थांना अद्यापही पचलेल नाही. याप्रकरणी आता एटीएससोबतच आयबीही या दोघांची चौकशी करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदर आणि सचिनला आयबी आणि एटीएसने पुन्हा एकदा चौकशीसाठी उचलले आहे. यापूर्वीही यूपी एटीएसने सचिन आणि सीमा यांची 2 दिवस चौकशी केली होती. यावेळी सीमा आणि सचिन यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगण्यात आले होते. यानंतर त्यांना सुरक्षित घरात हलविण्यात आले होते. मात्र, यानंतर सीमा आणि सचिन यांना सोडून देण्यात आले होते. पण सीमाची एन्ट्री आणि प्रेमकहाणी यासंदर्भात एटीएसने पुन्हा तपास सुरू केला आहे.
यापूर्वीही झाली होती चौकशी -
यापूर्वीच्या चौकशीत एटीएसने सीमाला अनेक प्रश्न विचारले होते. यात तिचा भाऊ लष्करात असल्याची माहितीही समोर आली होती. तसेच, सीमा आपल्या 4 मुलांसह, 3 देशांची सीमा पार करत भारतात कशी आली, असेही विचारण्यात आले होते. याशिवाय, काठमांडू येथे झालेल्या त्याच्या लग्नाचे पुरावेही एटीएसने मागितले होते. याच बरोबर, सीमाचे पाकिस्तानातील कागदपत्रेही समोर आले असून, यांत तिच्या वयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.