सीमा हैदरला सचिन नाही, कुणी औरच आवडतो...! जाणून घ्या कुणाचं नाव घेतलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 02:56 PM2023-07-22T14:56:45+5:302023-07-22T15:00:31+5:30

सीमा केवळ क्रिकेट विश्वचषक बघण्यासाठी भारतात आली आहे आणि तो पाहिल्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानात आपल्या पतीकडे परत येईल, असा दावा एका पाकिस्तानी युट्यूबरने केला होता. यावर सीमाने भाष्य केले आहे.

seema haider commented over rumours about her on social media and says i like virat kohli not sachin tendulkar | सीमा हैदरला सचिन नाही, कुणी औरच आवडतो...! जाणून घ्या कुणाचं नाव घेतलं?

सीमा हैदरला सचिन नाही, कुणी औरच आवडतो...! जाणून घ्या कुणाचं नाव घेतलं?

सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी तरुणी सीमा हैदरची (Seema Haider) जबरदस्त चर्चा सुरू आहे. कुणी तिला गुप्तहेर म्हणत आहे, तर कुणी धोका देणारी पत्नी म्हणत आहे. एवढेच नाही, तर सीमा केवळ क्रिकेट विश्वचषक बघण्यासाठी भारतात आली आहे आणि तो पाहिल्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानात आपल्या पतीकडे परत येईल, असा दावा एका पाकिस्तानी युट्यूबरने केला होता. यावर सीमाने भाष्य केले आहे.

सीमा म्हणाली, जे लोक म्हणत आहेत की, मी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतात आले आहे, तर हे चुक आहे. मला क्रिकेट आवडते पण एवढेही नाही. क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर मला आवडतो म्हणून मी सचिनवर प्रेम करते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की, माझा आवडता प्लेयर सचिन तेंडुलकर नाही, तर विराट कोहली आहे.

सीमा म्हणाली, “विराट कोहली मलाच काय, संपूर्ण पाकिस्तानलाच आवडतो. मला त्याचा लूक, स्टाइल आणि क्रिकेट खेळण्याचा अंदाज खूप आवडतो. पण मी भारतात त्याच्यासाठी नाही, तर माझ्या प्रेमासाठी, अर्थात सचिन मीनासाठी आले आहे.

याशिवाय, काही यूट्यूबर्सनी तर सीमा हैदर दुबईतील एका बारमध्ये डान्सर होती, असा दावाही केला आहे. यावर सीमा म्हणाली, मी कधी सिंध प्रांतातूनही बाहेर पडले नाही, तर दुबई दूरची गोष्ट आहे. मी पहिल्यांदा सिंधबाहेर पडले, तेही केवळ सचिनला भेटण्यासाठी. मी कधीही दुबईला गेले नाही. अशा पद्धतीने बदनामी करू नका, अशी विनंतीही सीमाने यावेळे केली.
 

Web Title: seema haider commented over rumours about her on social media and says i like virat kohli not sachin tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.