Seema Haider : पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; 'या' पक्षाने दिली मोठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:44 AM2023-08-03T11:44:32+5:302023-08-03T11:56:09+5:30
Seema Haider : सीमा राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पक्षाने तिला मोठी ऑफर दिल्याचं म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर विविध मुद्द्यांवरून चर्चेत आहे. 4 मुलांसह सीमा पाकिस्तानमधून अवैधरित्या भारतात आली आहे आणि ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा गावात तिचा प्रियकर सचिनसोबत राहते. याच दरम्यान आता सीमा राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पक्षाने तिला मोठी ऑफर दिल्याचं म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमा यांना त्यांच्या पक्षात समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी तुलना केली. "सोनिया गांधी इटलीतून येऊन भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, मग पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?" असा सवाल उपस्थित केला आहे.
किशोर मासूम पुढे म्हणाले की सीमा हैदर खरोखरच निर्दोष आहे, ती गुप्तहेर असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि तिला भारतीय नागरिकत्व दिलं गेलं, तर तिची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेशच्या महिला विंगच्या अध्यक्षपदी निवड केली जाईल. त्यामुळे आता सीमा खरंच राजकारणात येऊ शकते का? याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. सीमा हैदर या उत्कृष्ट वक्त्या आहेत. त्यामुळे राजकारणात नशीब आजमवावं असेही किशोर मासूम म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सीमा हैदर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री! हिरोईन बनण्याची ऑफर
सीमा हैदर बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर अमित जानी यांनी सीमा आणि सचिन यांना त्यांच्या फिल्म प्रोडक्शन हाऊस 'जानी फायर फॉक्स' च्या बॅनरखाली बनवल्या जाणाऱ्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. अमित जानी यांनी नुकतेच मुंबईत त्यांचे फिल्म प्रोडक्शन हाऊस तयार केले आहे. अमित जानी उदयपूरमधील टेलर कन्हैया लाल साहूच्या हत्येवर चित्रपट बनवणार आहेत. कन्हैया लाल साहूच्या हत्येवर अमित जानी यांच्या वतीने बनवण्यात आलेल्या या चित्रपटाला 'अ टेलर मर्डर स्टोरी' असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाची रिलीज डेट नोव्हेंबर आहे.