मिशन चंद्रयान-3 च्या यशासाठी सीमा हैदरने ठेवलं व्रत; देवाची पूजा करतानाचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:00 PM2023-08-23T15:00:53+5:302023-08-23T15:01:51+5:30

Seema Haider And Chandrayaan3 : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने देखील चंद्रयान 3 मोहिमेच्या यशासाठी एक व्रत केलं आहे. यासंदर्भात सीमा हैदरने एक व्हिडिओही जारी केला आहे.

Seema Haider fasted for success of mission Chandrayaan3 | मिशन चंद्रयान-3 च्या यशासाठी सीमा हैदरने ठेवलं व्रत; देवाची पूजा करतानाचा Video व्हायरल

मिशन चंद्रयान-3 च्या यशासाठी सीमा हैदरने ठेवलं व्रत; देवाची पूजा करतानाचा Video व्हायरल

googlenewsNext

भारताच्या महत्त्वाकांक्षी मिशन चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी, देशभरात लोक प्रार्थना करत आहेत. चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी देशाच्या बहुतांश भागात आज पूजा आणि होमहवन केले जात आहेत. याच दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने देखील चंद्रयान 3 मोहिमेच्या यशासाठी एक व्रत केलं आहे. यासंदर्भात सीमा हैदरने एक व्हिडिओही जारी केला आहे.

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सीमा हैदरने "माझी तब्येत ठीक नाही, तरीही मी उपवास करत आहे. भारताचे चंद्रयान 3 आज संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. यामुळे आपल्या देशाचे खूप नाव होईल. म्हणूनच चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे उतरेपर्यंत मी व्रत ठेवणार आहे" असं म्हटलं आहे. 

चंद्रयान-3 च्या यशासाठी ठेवलं व्रत

प्रार्थना करताना सीमा हैदर म्हणाली की, "राधा कृष्णावर माझी खूप श्रद्धा आहे. हे प्रभू, हे भगवान, हे प्रभू श्रीराम, हे सर्व देवी-देवता, आपल्या भारत देशाचे चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्रावर उतरू दे." यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत सीमा हैदरने आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान या मिशनच्या यशासाठी खूप मेहनत घेत आहेत. ज्यामुळे आपल्या देशाचे नाव उंचावेल आणि जगात दबदबा निर्माण होईल असं म्हटलं आहे. 

चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी सध्या देशभरात प्रार्थना आणि होम-हवन सुरू आहेत. चंद्रयान-३ आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्रयान उतरताच असे करणारा भारत हा जगातील एकमेव देश बनेल. कारण याआधी कोणत्याही देशाचं रोव्हर येथे उतरलेलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Seema Haider fasted for success of mission Chandrayaan3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.