"सचिनसोबत जायचं होतं तर..."; पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमाच्या नवऱ्याचं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:45 PM2023-08-24T17:45:25+5:302023-08-24T17:46:14+5:30
सीमाचे नवनवीन व्हिडिओही रोज समोर येत आहेत. याच दरम्यान आता सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने सौदी अरेबियातून एक व्हिडिओ जारी केला आहे.
पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर सतत चर्चेत असते. सीमाचे नवनवीन व्हिडिओही रोज समोर येत आहेत. याच दरम्यान आता सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने सौदी अरेबियातून एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने सीमावर अनेक आरोप केले आहेत. यासोबतच लवकरच भारतात जाणार असून आपल्या मुलांना आपल्या सोबत घेऊन येणार असल्याचं म्हटलं आहे.
गुलामने सीमाला शिक्षा व्हावी यासाठी काही प्लॅनिंग केलं आहे. सीमाने पत्नी आणि आई होण्याचा अधिकार गमावला आहे. मुलं निर्दोष असतात. त्यांना जे करण्यास सांगितलं जातं ते मुलं करतात असं गुलामने म्हटलं आहे. सीमा आणि सचिनचे लग्न त्याला मान्य नसल्याचं देखील सांगितलं. तसेच तिला सचिनसोबत जायचं होतं तर तिने तलाक घ्यायला हवा होता असं रोखठोक मत देखील व्यक्त केलं आहे. सीमाची ही चूक क्षमा करण्यासारखी नाही, तिच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पती गुलामने म्हटलं आहे.
प्रियकरासाठी पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा आणि तिच्या चार मुलांची सध्या चर्चा रंगली आहे. सीमा भारतात आता तिचा प्रियकर सचिन मीणासोबत राहत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सीमा हैदरचा पाकिस्तानी पती अतिशय दु:खी आहे. सौदी अरेबियात राहणाऱ्या गुलाम हैदरला चार मुलांची खूप आठवण येत आहे. ज्याच्यामुळे तो रात्रभर झोपत नाही. मुलांसाठी कुठेही जाणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. मग भारतात यावं लागलं तरी चालेल. याआधीही त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये त्याला अचानक आपल्या मुलांची आठवण आली आणि अश्रू अनावर झाले.
यूट्यूबवर गुलाम हैदरने सांगितले की, तो मुलांना खूप मिस करत आहे. "मुलं माझं जीवन आहेत, मी त्यांना सोडू शकत नाही. यासाठी मला भारतात जावं लागलं तरी मी जाईन. सीमाकडे गेल्याच्या दहा दिवस आधी मुलीने प्लॅस्टिकचा स्विमिंग पूल घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. यानंतर मी मुलीला घेईन असं सांगितलं. मी एका मुलाला मोबाईल दिला. मुलाला शाळेत, ट्युशनमध्ये पाठवलं. रोज अनेक वेळा मुलांशी बोलायचो" असं गुलामने सांगितलं आहे.