Seema Haider : "1 दिवसही शाळेत गेली नाही, 5 वी पास नाही..."; सीमाच्या नवऱ्याने सांगितलं तिचं खरं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 10:29 AM2023-07-17T10:29:58+5:302023-07-17T10:42:58+5:30

Seema Haider : पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या शिक्षणाची सध्या जोरदार चर्चा आहे.

Seema Haider pakistani woman husband ghulam haider revealed about her education | Seema Haider : "1 दिवसही शाळेत गेली नाही, 5 वी पास नाही..."; सीमाच्या नवऱ्याने सांगितलं तिचं खरं शिक्षण

फोटो - आजतक

googlenewsNext

पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या शिक्षणाची सध्या जोरदार चर्चा आहे. सीमाचे म्हणणे आहे की, तिने फक्त पाचवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. पण ती ज्या पद्धतीने बोलते आणि ज्या पद्धतीने ती मीडियाला मुलाखती देत ​​आहे, त्यावरून ती जास्त शिकलेली आहे, अशी शंका लोकांना येते. सीमा अचूक इंग्रजी बोलत असल्याचेही बोलले जात आहे. ती मुलांसह शारजाहमार्गे नेपाळ आणि नंतर भारतात आली आहे.

सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदर यालाही एका मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याने सांगितले की, सीमा एक दिवसही शाळेत गेली नाही. ती पाचवी पण पास झालेली नाही आणि याचाही पुरावा नाही. गुलाम म्हणाला की, गावातील एक शेजारी तिला घरी शिकवायला येत असे. त्यामुळे तिने इयत्ता पहिली, दुसरी किंवा तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं असावं. ती अभ्यासासाठी घराबाहेर पडली नाही. तिचा पाचवी पास असल्याचा दावा चुकीचा आहे. ती शिक्षित असल्याचा कोणताही पुरावा नाही.

गुलाम हैदर याने असेही सांगितले की, त्याला त्यांच्या मुलांची खूप काळजी आहे. त्याने सीमाला हात जोडून सांगितले की उद्या तुला काही झाले तर भारतात मुलांसाठी कोणी नाही. तो म्हणाला, 'मी तुला विनंती करतो, कृपया परत ये. हे एक आयुष्य आहे, ही दोन दिवसांची गोष्ट नाही. उद्या तुला काही झालं तर मुलांची काळजी कोण घेणार, मुलांचं तिथे कोणी नाही. मी दोन्ही सरकारांना आवाहन करतो.

गुलामने सांगितलं की, पूर्वी तो महिन्याला 45 हजार ते 50  हजार रुपये पाठवत असे. पुढे त्याने चांगली कमाई केली. त्यानंतर तो सीमाला महिन्याला 80 हजार रुपये पाठवू लागला. ही रक्कम जमा करून त्याने कराचीमध्ये 13.5 लाख रुपयांचे घरही खरेदी केले. हे घर विकून सीमा सचिनकडे आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Seema Haider pakistani woman husband ghulam haider revealed about her education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.