"मी सीमा हैदरला 5 वर्षे जेलमध्ये पाठवणार, मुलांना पाकिस्तानात..."; वकिलाने थेट सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:41 PM2024-03-02T15:41:40+5:302024-03-02T15:51:38+5:30
मोमीन मलिक यांनी सांगितलं की, सीमाला लवकरच पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
पाकिस्तानी नागरिक गुलाम हैदरचे वकील मोमिन मलिक यांनी सीमा हैदरला पाच वर्षांसाठी जेलमध्ये पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच वकिलांनी गुलाम हैदर याला त्याची मुलं परत मिळावीत, अशी मागणी केली आहे. मोमीन मलिक हे हरियाणातील पानिपतचे रहिवासी असून ते पाकिस्तानच्या गुलाम हैदरचे वकील आहेत.
सीमा हैदरला शिक्षा झाल्यानंतरच आपण शांत बसणार असल्याचं सांगितलं. मोमीन मलिक यांनी सांगितलं की, सीमाला लवकरच पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. सीमाने सचिनशी घटस्फोट न घेता लग्न केलं, जे बेकायदेशीर आहे. मी मुलांना वडील गुलाम हैदर यांच्या ताब्यात देईन. सीमा आणि गुलाम हैदर यांच्या मुलांवर वडिलांचा अधिकार आहे. त्यामुळे गुलामाला मुलांचा ताबा मिळावा.
सचिनवर आरोप करत म्हटलं की, सीमा आणि सचिन काहीही करू शकतात, पण मुलांचे धर्मांतर का करण्यात आलं. मुलांना अजून काही कळत नाही. सीमाला सीमा मीणा नाही तर सीमा हैदर असंच म्हणा. पाकिस्तानच्या अंजू आणि नसरुल्लाह यांच्या प्रश्नावर वकील म्हणाले की, अंजू असो किंवा सीमा हैदर, घटस्फोटाशिवाय पुन्हा लग्न करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
सीमा हैदरला सोशल मीडियावरून होणाऱ्या कमाईबाबत मोमीन मलिक म्हणाले की, "हे बेकायदेशीर आहे. सीमा हैदर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती खूप पैसे कमवत आहे, जे कायदेशीररित्या चुकीचे आहे, मी हे सर्व थांबवणार आहे."
गेल्या वर्षी पाकिस्तानची सीमा हैदर तिचा प्रियकर सचिन मीणासोबत राहण्यासाठी तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. सीमा आणि सचिनने सांगितले होते की, त्यांची भेट नेपाळमध्ये झाली, जिथे दोघांनी मंदिरात लग्न केलं. PUBG गेम खेळताना सीमा आणि सचिन एकमेकांच्या संपर्कात आले आणि पुढे एकमेकांच्या प्रेमात पडले.