भारत की पाकिस्तान? सामन्यात कुणाला सपोर्ट करतेय सीमा, VIDEO शेअर करत स्पष्टच सांगितल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 08:45 PM2023-09-10T20:45:24+5:302023-09-10T20:47:28+5:30
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात, तिने भारत-पाकिस्तान सामन्यात ती कुणाला सपोर्ट करत आहे? हे सांगितले आहे.
आशिया कप 2023 च्या सुपर- 4 राउंडसाठी कोलंबोमध्ये सुरू असलेला भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. या सामन्याबद्दल दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. यातच, पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात, तिने भारत-पाकिस्तानपैकी ती कुणाला सपोर्ट करत आहे? हे सांगितले आहे.
सीमा कुणाला करतेय सपोर्ट?
एक व्हिडिओ पोस्ट करत सीमा म्हणाली, 'जय श्री राम. आज भारत-पाकिस्तान सामना आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. मात्र, भारताने हा सामना जिंकावा, अशी माझी इच्छा आहे. आपला भारतीय संघ जिंकावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन. जी-20 च्या यशस्वी आयोजनाबद्दलही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जींचे अभिनंदन. जय श्री राम। राधे-राधे। हिंदुस्तान जिंदाबाद।'
सीमा आपल्या चार मुलांसह अवैध पद्धतीने पाकिस्तानातून ग्रेटर नोएडामध्ये आली आहे. पबजी गेम खेळताना आपण सचीनच्या प्रेमात पडलो आणि प्रेमासाठी आपण देश सोडला, असा तिचा दावा आहे. सीमाने गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका करत भारतीय नागरिकत्वाची मागणी केली आहे.
महत्वाचे म्हणजे, सीमावर पाकिस्तानी हेर असल्याचा आरोपही केला जात आहे. एटीएस सह अनेक संस्था सीमा प्रकरणाचा तपास करत आहेत. महत्वाचे म्हणजे, अमित जानी नावाचे एक प्रोड्यूसर सीमाच्या लव्ह स्टोरीवर 'कराची टू नोएडा' नावाचा एक चित्रपटही बनवत आहेत.