सीमा हैदरचं पाकिस्तानला जायचं तिकीट 'बूक'! आता सचिनच्या प्रेमकहाणीचं काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:08 PM2023-08-11T17:08:51+5:302023-08-11T17:09:17+5:30
सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीवर चित्रपटही येणार असल्याची चर्चा
Seema Haider Sachin Love Story, Pakistan Ticket: आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या सीमा हैदरचे परत जाण्याचे तिकीट बूकिंग झाले आहे. त्यामुळे आता सीमा खरोखरच पाकिस्तानात परतणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने सोशल मीडियावर तिकीटाचा फोटो शेअर केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी तिकिटाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी सीमा आणि सचिनच्या कथेवर बनणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.
दिग्दर्शक-निर्माते अमित जानी सीमाच्या कथेवर चित्रपट बनवत असल्याचे वृत्त आहे. सीमा हैदरचे पहिले पती गुलाम हैदर यांनाही त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण पाठवले आहे. या चित्रपटाचे नाव 'कराची ते नोएडा' असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी त्याने ऑडिशन्सही घेतल्या आहेत. त्यांनी सीमाचे पती गुलाम हैदर याला दिल्ली किंवा मुंबईला येण्यास सांगितले आहे. त्यावरून आता वातावरण तापले आहे. तिकीटाचा फोटो आणि चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिषेक यांनी लिहिले आहे, '#SeemaHaider, देशाच्या गद्दारांना भारतात राहायला जागा मिळणार नाही, तुमच्या हिरोईनला घेऊन पाकिस्तानात जा. अमित जानी यांना देशात हिंदू-मुस्लिम दंगल घडवायची आहे."
चित्रपटासाठी सीमाचे आधीचे पती गुलाम हैदर यांच्याशी बोलू इच्छित असल्याचे सांगत अमित जानी यांनी व्हिडिओ जारी केला. त्यांना सीमेबाबत अधिकाधिक माहिती गोळा करायची आहे. गुलाम यांना सांगण्यात आले आहे की ते भारतात येऊ शकत नसतील, तर त्यांचे लेखक सौदी अरेबियाला जाऊ शकतात आणि त्यांची भेट घेऊ शकतात. गुलाम सीमाशी संबंधित माहिती देऊ शकतात, जी चित्रपटासाठी महत्त्वाची ठरू शकते. अमित जानी म्हणले की, देशातील आणि जगातील लोकांना सचिन आणि सीमाची कहाणी जाणून घ्यायची आहे. यासाठी 50-60 मॉडेल्सच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.