सीमा हैदर-सचिनचे दिवस पालटले; युट्युबमुळे आले ‘अच्छे दिन’; आतापर्यंत केली ‘इतकी कमाई’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:57 PM2023-11-09T14:57:07+5:302023-11-09T15:00:00+5:30
Seema Haider Youtube Income: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर युट्युबर बनली आहे.
Seema Haider Youtube Income: सचिनवरील प्रेमासाठी सीमा हैदर भारतात आली. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची प्रेम कहाणी आता सर्वांनाच माहिती आहे. सोशल मीडिया तसेच मीडियाच्या माध्यमाने सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी देशाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. सीमा हैदरने १५ ऑगस्टला घरावर तिरंगा फडकवला, एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी करवा चौथ सणही साजरा केला. पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर युट्युबर बनली असून, सचिन आणि सीमा यांचे दिवस पालटले आहेत. युट्युबमुळे सीमा हैदरची कमाई चांगली होत असून, हजारो रुपये मिळाले आहेत. याबाबत सीमाने माहिती दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सीमा हैदरने आता यूट्यूबवरून पैसे कमवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी यूट्यूबने सीमा हैदरच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. सीमा हैदरची ही युट्युबवरील पहिली कमाई असून, सीमा आणि सचिन यूट्यूबवरून झालेल्या पहिल्या कमाईने खूप खूश असल्याचे सांगितले जात आहे. एका मुलाखतीत बोलताना सीमा हैदरने युट्युब कमाईबाबत प्रतिक्रिया दिली.
युट्युबवर सीमा हैदरचे व्ह्युवर्स वाढले
ऑक्टोबरमध्ये यूट्यूबवरून पहिले पेमेंट मिळाल्यानंतर सीमा हैदरने आनंद व्यक्त केला आहे. सीमा हैदरने यापूर्वी का पैसे मिळाले नाहीत, याचे कारणही उघड केले. सीमा हैदरने सांगितले की, पूर्वी तिचे व्ह्यूज खूप कमी होते त्यामुळे पैसे मिळत नव्हते. आता व्ह्यूज चांगले झाले आहेत म्हणून यूट्यूबने पहिले पेमेंट पाठवले आहे. भविष्यात यूट्यूबवरून चांगली कमाई होईल, असा विश्वास सीमा हैदरने बोलून दाखवला.
दरम्यान, पाकिस्तानातून आल्यानंतर सीमा आणि सचिन भाड्याच्या घरात राहत होते. आता सीमा हैदरने स्वतःची रुम घेतली आहे. सीमा हैदरने सांगितले की, तिने लोकांच्या मदतीने आपली रुम घेतली. तसेच युट्युबवरील कमाईतून स्वतःसाठी दागिने बनवल्याचे सीमा हैदरने सांगितले.