सीमा हैदरला व्हायचं होतं YouTuber?; तपास यंत्रणांना 'या' गोष्टीचा संशय, सांगितलं 'हे' मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 10:21 AM2023-07-29T10:21:35+5:302023-07-29T10:22:11+5:30
Seema Haider : सीमाने नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला आहे.
सीमेपलीकडील प्रेमकहाणी सध्या खूप चर्चेत आहे. सीमा हैदर प्रेम शोधण्यासाठी पाकिस्तानातूनभारतात आली आहे. सीमाने नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला आहे. त्यामुळेच ती पाकिस्तानची गुप्तहेर आहे का? किंवा तिला youtuber व्हायचं होतं का? की सीमा हैदरने आयएसआयची काही योजना राबवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेऊन सचिनला पहिलं प्रेमाच्या जाळ्यात अडकवले? आणि मग भारतात आली? असे शेकडो प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सी आता सीमा हैदरच्या सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहेत. सीमा हैदरने भारतात येण्यापूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती आणि सचिन एकमेकांच्या जवळ दिसतात. सीमा हैदरने 7 फेब्रुवारी 2022 पासून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांनंतर तिने 'मीणाजी मिस यू' या कॅप्शनसह सचिनचा फोटो पोस्ट केला. सचिनला प्रभावित करण्यासाठी सचिनच्या फोटोसह प्रेमाने लिहिलेल्या पोस्ट टाकल्या आहेत. सीमाच्या बहुतांश पोस्टमध्ये फक्त सचिनची पोस्ट टाकून प्रेम व्यक्त करण्यात आले आहे. सीमाचे सर्व सोशल मीडिया आयडी फार जुने नाहीत. यामुळेच सीमा हैदरच्या दाव्यावर एजन्सी समाधानी नाही.
आता तपास यंत्रणा सीमा हैदरचे यूट्यूब कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एजन्सींच्या म्हणण्यानुसार, सचिनला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याची सुरुवात सोशल मीडियावर त्याच्यावर प्रभाव टाकण्यासाठी नव्हती कारण एजन्सींना शंका आहे की सीमा हैदरने भारतात येण्यापूर्वी सोशल मीडियावर स्वत: ला YouTuber म्हणून सादर केले असावे. याच्या आडून ती स्वतःला सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा जेव्हा एजन्सी तिच्यावर संशय घेते आणि प्रश्नांची उत्तरे मागते तेव्हा ती स्वत: ला YouTuber म्हणवून आणि स्वतःच्या बनवलेल्या व्हिडिओमध्ये सचिनच्या प्रेमासाठी भारतात आली असल्याचं म्हणते.
सीमा हैदर अनेक वर्षांपासून व्हिडीओ बनवत आणि पोस्ट करत असल्याचा दावा करत असताना संशय वाढला आहे. पण आता तिने कधीपासून पोस्ट टाकायला सुरुवात केली ते पाहिलं जात आहे. कारण पाकिस्तानात राहून तिला इतके व्हिडीओ उघडपणे पोस्ट करता आले नाहीत. सोशल मीडियावर तिला व्ह्यूजही कमी आहेत आणि तिच्या पोस्टची संख्याही खूप कमी आहे. सीमा हैदरने सोशल मीडियाच्या मदतीने सचिन मीणापर्यंत पोहोचली का आणि त्यानंतर त्याच्या मदतीने ती नेपाळमार्गे भारतात आली का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता तपास यंत्रणा करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.